खेळ कुठलाही असो, त्यासाठी आपल्याला सरावाची गरज असते. आणि सराव आला म्हणजे प्रशिक्षकाची गरज लागणारच. प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना, खेळाबद्दलचे धडे शिकवत असतात. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला घडवण्यामागे देखील स्व.रमाकांत आचरेकर यांचा हात होता. सचिन तेंडुलकरने अगदी कमी वयातच फलंदाजीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
आता स्वतः सचिन तेंडुलकर ही संधी युवा खेळाडूंना उपलब्ध करून देणार आहे. सचिन तेंडुलकरची अनएकेडमीसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अनएकेडमी हे ऑनलाईन ऍप आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात थेट संवाद होतो. यामुळे सचिन तेंडुलकर सोबत युवा खेळाडूंना थेट संवाद साधता येणार आहे. आणि मुख्य बाब म्हणजे हे थेट संवाद सत्र मोफत असणार आहे.
सचिन तेंडुलकरने दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, “मी ऑनलाईन मोफत सत्र आयोजित करत आहे. यात कोणीही सहभागी होऊ शकेल. पूर्ण विचार माझ्या अनुभवाला सर्वांसोबत शेअर करणे असणार आहे. मी खूप साऱ्या मुलांना प्रत्यक्ष शिकवले आहे. परंतु डिजिटली शिकवणे पहिल्यांदाच होणार आहे. हा विचार १०० युवकांपर्यंत नाही राहणार तर, लाखो युवकांपर्यंत जाणार. आमचे हेच लक्ष्य आहे की आम्ही सर्वांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि सर्वांना मला प्रश्न विचारता आले पाहिजे.”
सचिन तेंडुलकरची कामगिरी
सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावले आहेत. तसेच सचिनने भारतीय संघासाठी सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण १५९१९ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण ५१ शतक आणि ६८ अर्धशतक झळकावले आहे. तसेच ४६३ वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. यात ९६ अर्धशतक आणि ४९ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने एकमात्र टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या:
डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय
विराट कोहलीसह खेळण्याबाबत सूर्यकुमार यादवने दिली प्रतिक्रिया, म्हणाला