---Advertisement---

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”

Sachin Tendulkar Arjun Tendulkar
---Advertisement---

Arjun Tendulkar Birthday :- भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा आज (24 सप्टेंबर) वाढदिवस आहे. अर्जुन मंगळवारी 25 वर्षांचा झाला. अर्जुन डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज असून, त्याने आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केले होते. वडील सचिन यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

अर्जुन याआधी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. मात्र, तिथे जास्त संधी न मिळाल्याने तो मुंबई सोडून गोव्यात दाखल झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या घातक गोलंदाजीने तो फलंदाजांना त्रस्त करताना दिसला. त्याचवेळी, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच वडील सचिन यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या.

आपल्या मुलासाठी पोस्ट करताना सचिनने लिहिले, ‘माझ्या गुणी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे जीवनावरील प्रेम आणि अथक समर्पण मला दररोज प्रेरणा देते. सकाळी तुला जिममध्ये जाताना पाहणे तुझी कामाप्रतीची नैतिकता दर्शवते. तुझा नेहमीच अभिमान आहे! तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी हे आणखी एक वर्ष आहे.’ सचिन व्यतिरिक्त बहीण सारा तेंडुलकर हिनेदेखील अर्जुनला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

अर्जुन तेंडुलकरने 2021 मध्ये हरियाणाविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण केले. अर्जुन महत्त्वाच्या वेळी फलंदाजीत आक्रमक धावा करण्यातही सक्षम आहे. 2021 च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. पंधराव्या हंगामापूर्वी अर्जुनला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांत रिटेन केले. अर्जुनने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत 5 सामन्यात बॅटने 13 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने 5 सामने खेळताना 3 बळी घेतले आहेत. यासोबतच रणजी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एक शतक देखील आहे.

हेही वाचा- 

‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ
सचिनच्या मुलाची देशांतर्गत क्रिकेटमधून करोडोंची कमाई! त्याची एकूण संपत्ती किती?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---