नवी दिल्ली। भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंची बॅट बनवणारा कारागीर म्हणजेच अशरफ चाचा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ७० वर्षीय अशरफ चौधरी (चाचा) रुग्णालयात दाखल आहेत. ते काही दिवसांपूर्वीच चर्चेचा विषय ठरले होते. आता सचिन त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
क्रिकेट जगतात अशरफ चाचा या नावाने ओळखले जाणारे हे व्यक्ती मागील काही दिवसांपासून डायबिटीज आणि न्युमोनियाशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी सचिन, विराट यासोबत अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंच्या बॅट दुरुस्त केल्या आहेत. परंतु कोविड-१९ मुळे त्यांच्या संकटांमध्ये वाढ झाली आहे. परंतु आता अशरफ यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, सचिनने त्यांच्याशी चर्चा केली आणि आर्थिक मदतीसाठीही तो पुढे आला आहे.
मुंबईमध्ये मेट्रो सिनेमाच्या समोर अशरफ यांचे खेळाच्या साहित्याचे मोठे दुकान आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. कोरोनामुळे काम ठप्प झाल्यामुळे त्यांच्यापाशी काम करणारे लोक आपापल्या घरी निघून गेले आहेत. अशात अशरफ यांना आजारामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या आजाराचे कारण हे कोरोना व्हायरस नसून ते किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेदेखील नाहीत. परंतु आता सचिन त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
"Sachin Tendulkar comes forward to help Ailing Ashraf Chaudhary ".
Ashraf chacha had once repaired his bat.. "Greatness lies in Humanity " …
Great work sir .. @sachin_rt @mipaltan @BCCI pic.twitter.com/j3PLooyX11— vijitashwa Mishra (@VijitashwaMisra) August 25, 2020
यापूर्वी सोशल मीडियावर अशरफ यांच्या मदतीसाठी काही लोकांनी बॉलिवूड सुपरस्टार सोनू सूदकडे मदत मागितली होती. त्यावर सोनू सूदने याची दखल घेत अशरफ यांचा पत्ता शोधण्यास सांगितले होते.
पता ढूँढो इस भाई का। https://t.co/QiwEoy5vjK
— sonu sood (@SonuSood) August 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-आश्चर्यकारक! खेळपट्टीमध्ये दबला चेंडू, सामन्याला झाला उशीर
–गिब्ज, विराटला वगळत रैनाने निवडले जगातील सर्वात्तम ५ क्षेत्ररक्षक
-जोफ्रा आर्चरने सहा वर्षांपूर्वी केलेले ट्विट होतेय व्हायरल, रिया संबधी केले होते भाष्य
ट्रेंडिंग लेख-
-सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता
-‘या’ ५ क्रिकेटर्सच्या नावाची गंमतच वेगळी, मोठ्या शहरांची आणि यांची नावं आहेत सारखी
-पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर