---Advertisement---

तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सारा कधी करतेय लग्न? तिने स्वत:च सांगितलंय

sara tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा सोशल मीडियाव प्रचंड सक्रिय असते. साराचे राहणीमान खूपच ग्लॅमरस आहे. साराचा बॉयफ्रेंड आणि लग्नाविषयीच्या बातम्याही सतत माध्यमांमध्ये येत असतात. परंतु तिने अद्याप याविषयी कसलीही पुष्टी केली नाहीये. असे असले तरी, तिच्या एका व्हिडिओतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, तो लवकरच लग्न करू इच्छित आहे. 

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक रिल शेअर केली आहे. व्हिडिओत तिच्यासोबत जवळची मैत्रीण अलीशा देखील दिसत आहे. सारा आणि अलीशाने हा व्हिडिओ खूपच मजेशी अंदाजात बनवला आहे. यादरम्यान साराने स्वतःच्या लग्नाविषयी महत्वाचे संकेत दिले. व्हिडिओत दोघीही एकमेकांविषयी माहिती देताना दिसत आहेत.

व्हिडिओ खूपच मेजेशीर आहे. तुम्हा दोघींपैकी कोण आगोदर लग्न करेल? या प्रश्नावर साराने उत्तर दिले. प्रश्न विचारला गेल्यानंतर साराने पहिल्यांदा हात वर केला, ज्यावर समजू शकते की, लग्न करण्यासाठी इच्छुक आहे. चाहते तिच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चे करू लागले आहेत. व्हिडिओत लग्नाविषयीच्या उत्तराव्यतिरिक्त साराने ती खूप पैसे खर्च करत असल्याची माहिती दिली. तसेच तिला साधे रहायला आवडते असेही ती म्हणाली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात येत आहेत.

https://www.instagram.com/reel/ChuS0AhAZip/?utm_source=ig_web_copy_link

मिळालेल्या माहितीनुसार सारा आणि अलीशा या दोघी जवळच्या मैत्रीणी आहेत. या दोघांना नेहमीच सोशल मीडियावर एकत्र पाहिले गेले आहे. अलीशा साराप्रमाणेच मुळची मुंबईकर आहे. तिचे शिक्षण ब्रिटेनच्या रॉयल ऍकेडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट मध्ये पूर्ण झाले आहे. दरम्यान, सारा आणि भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल यांच्यातील संबंधांविषयी मागच्या मोठ्या काळापासून चर्चे होत आल्या आहेत. माध्यामांमध्ये नेहमीच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जाते, परंतु आजपर्यंत याविषयी खात्रीशीर कोणताही पुरावा दिला गेला नाहीये. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या देखील समोर अल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘फॉर्ममध्ये परत ये आणि शतकही कर, पण आमच्याविरुद्ध नको’, विराटला खूपच घाबरलाय पाकिस्तानी गोलंदाज 
दबाव कमी करण्यासाठी विराटचा जालीम उपाय, भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी केले असे काही
भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---