भारतीय संघाचा युवा सालामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओत दिसते की, ऋतुराजला प्रश्नांची उत्तरे झटपट द्यायची आहेत. या रॅपिड फायर राउंडमध्ये त्याने अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान, त्याला सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी या दोघांपैकी एकाची निवड करावी लागली. या प्रश्नावर दिलेल्या उत्तरावरून सचिन आणि धोनीविषयीचे ऋतुराजच्या मनातील प्रेम स्पष्ट झाले.
बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋतुराज गाडकवाड (Ruturaj Gaikwad) मूळचा पुण्याचा आहे. त्याला पहिला प्रश्न विचारला गेला की, पुण्यातील सर्वात आवडती डिश कोणती आहे? यावर उत्तर देताना ऋतुराजने ‘डोसा’ हे उत्तर दिले. त्यानंतर ऋतुराजचा प्रश्न विचारला गेला की, तू क्रिकेट खेळला नसता, तर दुसरा कोणता खेळ निवडला असता? यावर त्याने टेनिस हे उत्तर दिले. पुढेचा प्रश्न असा होता की, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यातील कोणासोबत ट्रेनिंग करायला आवडेल? यावर उत्तर देताना ऋतुराजने रॉजर भेटरर याचे नाव घेतले. फेडररने त्याच्या कारकिर्दीत एकूण २० ग्रॅन्डसॅम जिंकले आहेत.
पुढचा प्रश्न ऋतुराजसाठी खऱ्या अर्धाने कठीण होता. एमएस धोनी (MS Dhoni) सोबत सराव की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत रात्रीचे जेवण कराशील? या प्रश्नावर त्याने जे उत्तर दिले, त्यातून एकच समजते की, ऋतुराज या दोन्ही दिग्गजांचा मोठा चाहता आहे. ऋतुराज म्हणाला की, “आधी धोनीसोबत सराव करेल आणि नंतर सचिन तेंडुलकर सोबत रात्री जेवण करेल.” त्याच्या या उत्तराचे चाहते कौतुक करत आहेत.
Inspirations ????
Favourite meal ????
Best batting partner ????
A round of Quick Answers with @Ruutu1331 as he shares this & more! ⚡ ⚡ #TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/Xu6SNmFR2H
— BCCI (@BCCI) August 21, 2022
रॅपिड फायर राउंडमध्ये असेही समजले की, ऋतुराजचला फिरकी गोलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजांचा सामना करायला आवडते. तसेच सूर्यकुमार यादवनला त्याने सर्वोत्तम पिक-अप शॉट खेळण्यासाठी निवडले. युवा फलंदाजाने सांगितले की मेलबर्न क्रिकेट ग्राउंडपेक्षा लॉर्ड्सवर त्याला कसोटी पदार्पण करायला आवडेल. असे असले तरी, त्याचे सर्वात आवडते मैदान चेपॉक स्टेडियम आहे.
ऋतुराजने सांगितले की, इशान किशनसोबत फलंदाजी करायला त्याला आवडते. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे त्याचे आवडते खेळाडू आहेत. जर एखाद्या वाळवंटात फसला, तर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना सोबत ठेऊ इच्छित असेल, असेही त्याने पुढे बोलताना सांगितले. दरम्यान, भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि ऋतुराजाही संघासोबत आहे. असे असले तरी, तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकही सामना न खेळता भारतात परतणार ‘हे’ तिघे, एकटा तर फक्त टूरिस्ट म्हणून जातोय दौऱ्यांवर
फक्त इंग्लिशच नाही बाबर आझम संघांची नावेही विसरतोयं! व्हिडिओ होतोयं चांगलाच व्हायरल
चहलशी संबंध बिघडल्याच्या…! धनश्रीने इंस्टा पोस्टमध्ये दिली सविस्तर माहिती