विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2024-25) मध्ये विदर्भाचे नेतृत्व करणारा भारतीय फलंदाज करुण नायर (Karun Nair) सध्या त्याच्या अद्भुत फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत त्याने स्पर्धेतील 7 डावात 5 शतके झळकावली आहेत. हे पाहून माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) करुण नायरचे भरभरून कौतुक केले आहे.
‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) करुण नायरसाठी (Karun Nair) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. मास्टर ब्लास्टरने आपल्या पोस्टमध्ये नायरच्या विजय हजारी ट्रॉफी 2024-25च्या आकडेवारीबद्दल लिहिले. तेंडुलकर म्हणाला की, असे प्रदर्शन असेच होत नाही. यासाठी एकाग्रता आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत.
महान सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “7 डावांमध्ये 5 शतकांसह 752 धावा करणे हे सोपं काम नाही, करुण नायर. असे प्रदर्शन फक्त घडत नाही, त्यासाठी लक्ष केंद्रित करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. दृढ राहा आणि प्रत्येक संधीचा फायदा घ्या.”
Scoring 752 runs in 7 innings with 5 centuries is nothing short of extraordinary, @karun126. Performances like these don’t just happen, they come from immense focus and hard work. Keep going strong and make every opportunity count!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 17, 2025
करुण नायरने 2024-25च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 7 डावात त्याने 752च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतकांसह 1 अर्धशतक झळकावले आहे. नायरने 7 डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये तो फक्त 1 वेळा बाद झाला.
करुण नायरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 6 कसोटी, 2 वनडे सामने खेळले आहेत. 6 कसोटीच्या 7 डावात फलंदाजी करताना त्याने 62.33च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 शतक झळकावले आहे. तर 1 त्रिशतक देखील झळकावले आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 303 राहिली आहे. 2 वनडे सामन्यात त्याने 46 धावा केल्या आहेत, तर त्याची सर्वोच्च धावंसख्या 39 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघात पुनरागमन करणार करुण नायर? म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत…”
“अशाप्रकारे संघाच्या बातम्या लीक होणं थांबेल”, आकाश चोप्रानं सांगितला रामबाण उपाय
रिंकू सिंहचा साखरपुडा झाला? समाजवादी पक्षाच्या खासदार सोशल मीडियावर चर्चेत