भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वनडे शतकांच्या बाबतीत मागे पडला. बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेचा उपांत्य सामना खेळताना विराट कोहली याने कारकिर्दीतील 50वे शतक केले. सोबतच सर्वाधिक वनडे शतकांच्या बाबतीत सचिनला मागे टाकले. या कामगिरीनंतर स्वतः सचिनने खास सोशल मीडिया पोस्ट करत विराटचे आभिनंदन केले.
वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023)चा हा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली (Virat Kohli) याने 117, तर श्रेयस अय्यर याने 105 धावांची खेळी केली. विराट कोहली याने आपल्या वनडे शतकांचा विक्रम मोडल्याचे समजल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने खास पोस्ट केली. पोस्टमध्ये सचिनने विराटच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. तिथपासून आजपर्यंतचा प्रवास हा अप्रतिम राहिल्याचे सचिनने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सचिन तेंडुलकर याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून लिहिले की, “मी पहिल्यांदा तुला भेटलो, त्यावेळी सहकारी खेळाडूंनी माझ्या पायाला स्पर्श करण्यासाठी तुझी टिंगल केली होती. त्यादिवशी मी हसू रोखू शकलो नव्हतो. पण लवकरच तू तुझ्यातील उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या मनाला स्पर्श केलास. त्यावेळी युवा असलेला तो मुलगा पुढे ‘विराट’ खेळाडू बनला, याचा मला आनंद आहे.”
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
सचिनने पुढे असेही लिहिले की, एखाद्या भारतीय खेळाडूने त्याचा विक्रम मोडला, याचा त्याला आनंद आहे. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत विराटची ही खेळी पाहून मास्टर ब्लास्टर भारावून गेल्याचे दिसते. “एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला, यापेक्षा जास्त आनंद कशात नाही. तेदेखील एका मोठ्या मंच्यावर, विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आणि माझ्या घरच्या मैदानात,” असे सचिनने या पोस्टमध्ये पुढे लिहिले. (Sachin Tendulkar made a special post after Virat Kohli broke the record of ODI centuries)
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: भारत-न्यूझीलंड सामना पाहणाऱ्यांनीही बनवला विश्वविक्रम, एकाच वेळी तब्बल इतके…
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल