गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारतीय संघाला ही कसोटी मालिका जिंकून देण्याक रिषभ पंतने महत्वाचे योगदान दिले होते. तसेच आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना, भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रिषभ पंतचे कौतुक केले आहे. तो कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा एक्स फॅक्टर ठरेल, असा दावा सचिनने केला आहे.
एका तासात खेचून घेतो सामना
सचिनने स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “कोणताही विरोधी खेळाडू त्याचा सामना करू पाहत नाही. कारण त्यांना माहीत आहे की, हा खेळाडू एका तासातच सामना खेचून घेण्यास सक्षम आहे. तो ऍडम गिलख्रिस्टसारखा आहे.” (Sachin Tendulkar praised Rishabh pant)
रिषभ पंतच्या कारकिर्दीत अनेक उतार चढाव आले आहेत. त्याला संधी मिळत होती. परंतु त्याला धावा करण्यात अपयश येत होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळे वळण दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याने वनडे आणि टी-२० संघात पुनरागमन केले होते.
रिषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्येही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येतो. परंतु तो अनेकदा जिकरीचे शॉट खेळताना बाद झाला आहे. याबाबत भाष्य करताना सचिन म्हणाला, “मला हेही आठवण आहे की, अनेक लोकांनी रिषभ पंतवर टीका केली होती की, तो बेजबाबदारपणे फटकेबाजी करतो. पुन्हा रिषभ आणि पुजारा यांची तुलना व्हावी, असे मला वाटत नाही. पंतची पुजाराशी तुलना करू नये कारण त्याच्याकडे धावा काढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु जर हेच दोन्ही फलंदाज एका चुकीमुळे लवकर बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतले, तर त्यांच्या मोठ्या प्रदर्शनाला महत्त्व काय उरणार?”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कोणी मैदानात जाऊन शॉट खेळून धावा करत आहे. तर कोणी रक्षात्मक फलंदाजी करून धावा करत आहे. शेवटी धावफलक पुढे सरकणे महत्वाचे आहे.” रिषभ आणि पुजारा दोन्ही फलंदाजांकडून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ युवा शिलेदारात मला रोहितची छबी दिसते, पाकिस्तानी क्रिकेटरकडून तोंडभरुन कौतुक
टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता एका नव्हे ३ सामन्यांद्वारे ठरवा, शास्त्रींच्या मागणीवर आयसीसीचे आले उत्तर
टीम इंडियाबरोबर शास्त्री ‘डॉगी विंस्टन’चेही बनले गुरू, प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल