मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताचा फलंदाज शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने केवळ याच सामन्यात नाही, तर न्यूझीलंडविरुद्ध कानपूरला झालेल्या पहिल्या कसोटीतही अर्धशतकी खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली होती. आता त्याचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने शुबमन गिलचं कौतुक केलं आहे, याबरोबरच त्याला एक सल्लाही दिला आहे.
दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितलं की शुबमन गिल कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याची फलंदाजीची शैली उत्तम आहे, फक्त त्याला त्याच्या खेळीचं रूपांतर मोठ्या डावात करता आलं पाहिजे. शुबमनने न्यूझीलंड विरुद्ध कानपूर कसोटीमध्ये ५२ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबईत पहिल्या डावात ४४ धावा आणि दुसऱ्या डावात ४७ धावा केल्या.
गिलकडे दक्षिण आफ्रिकेत मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी आहे का, असं विचारलं तेव्हा सचिन तेंडुलकर पीटीआयशी बोलताना म्हणाला की, ‘फलंदाजीच्या शैलीची गोष्ट कराल तर वेग वेगळ्या धावपट्टीवर वेग वेगळी आव्हानं येतील. माझ्या मतानुसार शुबमन गिलने ब्रिस्बेन मध्ये केलेल्या ९१ धावा त्याला फायदेशीर आहेत आणि आपण तिथे तो कसोटी सामना देखील जिंकलो.’ गिलने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावांत ७१ चेंडूत ४४ धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात ४७ धावा केल्या.
सचिन म्हणाला, शुबमनकडे कठीण आणि चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे. शैलीबद्दल काही तक्रार नाही. त्याने चांगली सुरुवात केली आहे, पण त्याचं रूपांतर मोठ्या डावांत करता आलं पाहिजे.’
तेंडुलकर म्हणाला की, ‘गिलने शतकाच्या दबावाखाली खेळू नये, कारण त्याला आतून धावा करण्याची भूक आहे. संघात आल्यावर ती धावा करण्याची भूक त्यात आधीपासून आहे. त्याला फक्त त्याच्या डावाचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आली पाहिजे आणि त्यासाठी एकाग्रता कायम ठेवावी लागेल. कानपुर आणि मुंबई कसोटीत तो चांगल्या चेंडूंवर बाद झाला. त्यामुळे तो अजून शिकण्याच्या प्रक्रियेत आहे आणि तो शिकतोय देखील.’
तेंडुलकरने पदार्पणात शतक झळकावणाऱ्या अय्यरच कौतुक करताना म्हटले की, श्रेयसने संधीचं सोनं केलं. आधी धावसंख्या जास्ती नव्हती, पण नंतर उत्कृष्ट खेळी करून भारताला विजयाजवळ पोहचवले. दोन्ही डावांत केलेल्या धावा महत्त्वपूर्ण होत्या. कसोटी खेळताना थोडा दबाव येईल पण बरेच टी२० सामने खेळले असल्याने तो दबाव कमी झाला आणि तो त्याची स्वाभाविक खेळी खेळू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलने क्लासिक चौकार मारताच, मैदानात घुमला ‘सचिन…सचिन…’ आवाज; पाहा व्हिडिओ
Video: रचिन रवींद्रच्या फिरकीपुढे भारतीय कर्णधाराची गिरकी, असा झाला विराट क्लीन-बोल्ड