---Advertisement---

Video: रचिन रवींद्रच्या फिरकीपुढे भारतीय कर्णधाराची गिरकी, असा झाला विराट क्लीन-बोल्ड

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 6:19 PM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी समान सुरू आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्याच्या स्थितीत आहे, तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला कानपूर कसोटीत विश्रांती देण्यात आली होती. त्याने मुंबईच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात पुनरागमन केले. परंतु, पुनरागमन करत असलेल्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात तो एजाज पटेलच्या गोलंदाजीवर ० धावांवर पायचीत होऊन माघारी परतला होता. या वादग्रस्त निर्णयानंतर तिसऱ्या पंचांवर जोरदार टीका देखील करण्यात आली होती.

तसेच दुसऱ्या डावात विराट कोहली फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत होता. असे वाटत होते की, तो या डावात शतकाची प्रतीक्षा संपवणार. परंतु, हे स्वप्न रचिन रवींद्रने मोडून काढले. तर झाले असे की, विराट कोहली ३६ धावांवर फलंदाजी करत असताना ६३ वे षटक टाकण्यासाठी रचिन रवींद्र गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, विराट कोहलीचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून यष्टीला जाऊन धडकला.

https://twitter.com/be_ritindra/status/1467401857374908416

दुसऱ्या डावात भारतीय संघाने घेतली ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ६२ धावांवर बाद केल्यानंतर दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली, तर चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल या दोघांनी मिळून प्रत्येकी ४७ धावा केल्या. भारतीय संघाने दुसरा डाव २७६ धावांवर घोषित केला आहे. यासह न्यूझीलंड संघासमोर विजयाचे ५४० धावांचे आव्हान दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमिताभ बच्चनचा फोटो असलेले मीम शेअर करत वसीम जाफरने किवी संघाची घेतली फिरकी

शुबमन गिलने क्लासिक चौकार मारताच, मैदानात घुमला ‘सचिन…सचिन…’ आवाज; पाहा व्हिडिओ

“मला सिराजमध्ये मॅकग्राची झलक दिसते”; वरिष्ठ भारतीय खेळाडूने गायले गुणगान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---