विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता, भारतीय संघाला या मोठ्या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच न्यूझीलंड संघानेही इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवत आपला दम दाखवला आहे. त्यामुळे या मोठ्या सामन्यात, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
या मोठ्या सामन्यापूर्वी, अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मत मांडले आहे. यामध्ये आता माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भर पडली आहे. सचिननेही या सामन्याबाबत आपले मत मांडले आहे.
सचिनने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला माहित नाही की, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील वेळापत्रक केव्हा ठरले. असे वाटते की, हा कार्यक्रम आधीच ठरवण्यात आला होता. कदाचित तेव्हा न्यूझीलंड संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले नव्हते. किंवा असेही होऊ शकते की, हा एक योगायोग असावा. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर ही मालिका झाली असतो तर आणखी बरे झाले असते.” (Sachin Tendulkar raised questions on England vs Newzealand test series)
सचिन पुढे म्हणाला की, “यात काही शंका नाही की, भारतीय संघापेक्षा न्यूझीलंड संघ जास्त फायद्यात असणार आहे. कारण त्यांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. तर भारतीय संघाने सराव सामना ही खेळला नाहीये. त्यांनी केवळ एकमेकांमध्ये सामना खेळला आहे.” यावरुन दिसून येते की, सचिनने न्यूझीलंडचे पारडे अधिक जड असल्याचे सांगितले आहे.
कसोटी अजिंक्यपदच्या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंड संघाला पछाडले होते आणि १-० ने मालिका खिशात घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
विंडिजविरुद्ध बरसले होते ऑस्ट्रेलियाचे जाबाज, एकाच डावात ५ शतकांसह चोपल्या होत्या ७५८ धावा
इथेही खुन्नस! मांजरेकरांनी निवडली WTCच्या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन, जडेजाला केले बाहेर