---Advertisement---

विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 18, 2022 3:53 PM
Virat-Kohli-Sachin-Tendulkar
---Advertisement---

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘रनमशीन’ विराट कोहली (Virat Kohli) यांना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. विशेष म्हणजे विराट सचिनला आदर्श मानतो. तसेच सचिनला पाहूनच तो मोठा झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिनच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षात विराटही भारतीय संघाचा भाग होता. त्यामुळे नुकतेच सचिनने विराटबरोबरच्या एका भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे.

सचिनने त्याच्या अखेरच्या कसोटी सामन्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना विराटबद्दलही भाष्य केले. त्याने सांगितले की विराटने एक अनमोल भेट (Precious Gift) सचिनला अखेरच्या सामन्यादरम्यान दिली होती. तो खुल भावनिक क्षण होता.

अमेरिकन पत्रकार ग्रॅहम बेंसिंगर यांना मुलाखत देताना सचिनने या घटनेबद्दल आठवण सांगितली आहे. सचिन त्याच्या अखेरच्या सामन्याची आठवण सांगितला म्हणाला, ‘ड्रेसिंग रुममध्ये मी एका कोपऱ्यात बसलेलो होतो आणि माझे अश्रू पुसत होतो. माझ्यासाठी तो क्षण खूप भावुक होता. त्यावेळी विराट माझ्या जवळ आला आणि त्याने मला एक पवित्र लाल झाला दिला, जो त्याला त्याच्या वडीलांनी दिला होता.’

सचिनने पुढे सांगितले, ‘मी थोड्यावेळापर्यंत तो धागा माझ्याजवळ ठेवला आणि त्यानंतर पुन्हा तो विराटला परत केला. तेव्हा विराटला मी सांगितले की, हा धागा अमुल्य आहे आणि तो तुझ्याजवळ कायम राहिला पाहिजे, दुसऱ्यांकडे नाही. ही तुझी गोष्ट आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ही तुझ्याकडेच राहिली पाहिजे. तो भावनिक क्षण माझ्या आठवणीत कायम राहिल.’

सचिनने २०१३ साली अखेरचा कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे हा त्याचा कारकिर्दीतील २०० वा कसोटी सामना देखील होता. या सामन्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हा सामना सचिनच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता.

विराटनेही सांगितली होती आठवण
साधारण दोन वर्षांपूर्वी विराटने ग्रॅहम बेंसिंगर यांच्याच शोमध्ये सचिनच्या अखेरच्या कसोटीची हीच आठवण सांगितली होती. त्याने या घटनेबद्दल सांगितले होते की, ‘आम्ही बऱ्याचदा मनगटाला धागे बांधतो. भारतात अनेक लोक असं करतात. त्यामुळे माझ्या वडीलांनी मला ते घालत असलेला धागा मला दिला होता. त्यामुळे मी तो माझ्या बॅगमध्ये ठेवायचो. मला तेव्हा वाटले होते की, ही एकच गोष्ट आहे माझ्याजवळ, जी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे मी यापेक्षा आणखी मौल्यवान काही देऊ शकत नव्हतो. मला फक्त सचिनला एवढेच सांगायचे होते की, त्याने मला किती प्रेरणा दिली आहे आणि सर्वांसाठी तो किती महत्त्वाचा आहे. हे माझ्याकडून छोटी भेट होती.’

https://twitter.com/OmgSachin/status/1494324707461451784

सचिन निवृत्त झाल्यानंतर नेहमीच विराटकडे त्याचा वारसदार म्हणून पाहिले गेले. विशेष म्हणजे सचिननंतर भारताकडून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. सचिनने १०० शतके केली आहेत, तर विराटने ७० शतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

राडाच ना! रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ११ खेळाडूंचे शतक, तर एका गोलंदाजाची हॅट्रीक

तिघींनी अर्धशतके करून भारतीय महिलांच्या पदरी निराशाच! न्यूझीलंडने जिंकली तिसरी वनडे

वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत विजयी आघाडीची टीम इंडियाला संधी; असे असू शकते दोन्ही संघांची ‘प्लेईंग ११’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---