---Advertisement---

‘मास्टर ब्लास्टर’चे सोशल मीडियावरून आवाहन; म्हणाला, ‘कधीच दारू, जुगार अन् तंबाखूची…’

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 5:22 PM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा (Team India) माजी दिग्ग्ज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या खोट्या जाहिरातींमुळे हैराण आहे. त्याने गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सोशल मीडियावर एक आवाहन (Sachin Tendulkar Request) केले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तो कॅसिनोची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनने सांगितले आहे की, या जाहिराती खोट्या आहेत. त्याच्या टीमने जाहिरात करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

सचिन त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत म्हणाला आहे की, “मी वैयक्तिकरीत्या दारू, जुगार किंवा तंबाखूचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन केलेले नाही. परंतु माझ्या फोटोंचा गैरवापर केलेला पाहून मला वाईट वाटले. माझ्या लक्षात आले आहे की, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. ज्यामध्ये माझा चेहरा माॅर्फ करून कॅसिनोची जाहिरात केली जात आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी माझ्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. माझ्या कायदेशीर टीमने आवश्यक कारवाई केल्यामुळे, मला वाटले की, ही माहिती सर्वांसोबत शेअर करणे महत्त्वाचे आहे.”

सचिन तेंडुलकरने आयुष्यात कधीही तंबाखू किंवा दारू इत्यादींची जाहिरात केलेली नाही. सचिनने लोकांना सोशल मीडियावर चालणाऱ्या खोट्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्या जाहिराती फेटाळण्यासाठी सचिनने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या २५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघासाठी २०० कसोटी, ४६४ एकदिवसीय आणि १ टी२० सामना खेळला आहे. १२ वर्षांपूर्वी सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये द्विशतक केले होते. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४९, तर कसोटीत ५१ शतके झळकावली आहेत. सचिनने १६ व्या वर्षी भारतासाठी पहिला सामना खेळला होता आणि त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्व क्रिकेटप्रकारात मिळून ३४,३५७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने २८ हजार धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?

…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल

चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---