भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) त्याचा मालकी हक्क असलेला केरळा ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचे त्याचे सगळे शेयर्स विकले आहेत. आयएसएलच्या पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे यातच सचिनने हा निर्णय घेतला.
सचिन क्लबचा महत्त्वाचा भाग असल्याने हा निर्णय ब्लास्टर्ससाठी खुप मोठा धक्का आहे. कारण घरच्या किंवा बाहेर होणाऱ्या सामन्यांत क्लबला प्रोत्साहन देण्यात सचिनचा सर्वाधिक वाटा आहे. तसेच केरळमध्ये त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत.
“सचिन त्याचा केरळा क्लबमधील सगळा भाग विकण्याची शक्यता आहे. भावनिक नाते असले तरी त्यातून पुढे जाण्याची वेळ आली आहे”, असे आयएसएलच्या सुत्राने म्हटले आहे.
सचिनचे यात किती शेयर्स आहेत की नक्की नाही. तसेच त्याच्या मास्टर ब्लास्टर या टोपणनावावरून क्लबचे नाव ठेवण्यात आले.
सचिनने २०१४मध्ये हैद्राबादचा व्यावसायिक प्रसाद पोटलुरी यांच्या साथीने ब्लास्टर्स क्लब विकत घेतला होता. नंतर पोटलुरी यांनी त्यांचे शेयर्स चित्रपट निर्माता अल्लू अर्जुन आणि अभिनेते नागार्जुन, चिंरजीवी यांना विकले.
सचिनच्या या पावलामुळे आता क्लबमध्ये आता केरळचे व्यावसायिक आणि त्यांच्या ग्रुपचा सहभाग असणार आहे. तसेच ब्लास्टर्स त्याच्या पाचव्या हंगामातील पहिला सामना २९ सप्टेंबरला अॅटलेटिको द कोलकाता विरुद्ध खेळणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: शतकी खेळी करणाऱ्या मुशफिकूर रहिमने धोनी, संगकारालाही टाकले मागे
–एशिया कप २०१८: मुशफिकूर रहिमचे दमदार शतक; बांगलादेशची विजयी सुरुवात