कोविड-१९मुळे भारत सरकारने गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे घरात अडकलले क्रिकेटपटू त्यांचा वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. अशात काही क्रिकेटपटू इंस्टाग्राम लाइव्हमध्ये व्यस्त आहेत. तर काही वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ला फिट ठेवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सध्या घरी आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहायला मिळाला, ज्यामध्ये तो स्वत: त्याचे केस कापत होता. मात्र, सचिन यावेळी त्याचे नाही तर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे केस कापताना दिसत आहे. त्याने यासंबंधीचा व्हिडिओही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. Sachin Tendulkar shared video of cutting his son arjun’s hair.
https://www.instagram.com/p/CAXhC5klnr-/
सचिन त्याची मुलगी सारा तेंडुलकरची मदत घेत अर्जुनचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरील अनेक लोकांना आवडला आहे. सचिनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “एका वडिलाच्या नात्याने आपल्याला आपल्या मुलांसाठी खूप काही करावे लागते. मग ते मुलांसोबत खेळणे असो, जिममध्ये कसरत करणे असो किंवा त्यांचे केस कापणे असो. हेअरकट कसाही असो. अर्जुन तू नेहमी सुंदर दिसतोस. माझी सलून सहकारी साराला माझे विशेष आभार.”
ट्रेंडिंग घडामोडी-
पाकिस्तानच्या दोन मोठ्या खेळाडूंनी सोडला टीमचा वाॅट्सअप ग्रुप
हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी
प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या…