विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39 व्या सामन्यानंतर क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्या नावाची चर्चा सुरू आहे. मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. या सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 91 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, मॅक्सवेलने अखेरपर्यंत नाबाद राहत 201 धावांची खेळी केली. त्याचे कौतुक करताना सचिन तेंडुलकरने एक भली मोठी पोस्ट केली आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/1722211913831244182?t=uJEsK41xfyP4gzV3NXtWEg&s=19
या सामन्यात 292 धावांचे आव्हान पार करताना मॅक्सवेल याने फक्त 128 चेंडूंचा सामना करत तब्बल 201 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. त्याने संघाला सात बाद 91 अशा मोठ्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढत हा विजय मिळवून दिला. क्रिकेट जगतातील जवळपास सर्वांनी ही वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात महान खेळी असल्याचे म्हटले.
भारताचा सर्वकालिन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया पोस्ट करत लिहिले,
‘जीवन आणि क्रिकेटला अनेक समाता आहेत. कधीकधी, एखाद्या स्प्रिंगप्रमाणे हे तुम्हाला मागे खेचते. तेच तुम्हाला पुढे नेत असते. कालच्या खेळीदरम्यान, मॅक्सवेलच्या पायाला आलेल्या क्रॅम्प्समुळे त्याला खेळताना अडथळा निर्माण होत होता. तो क्रीजवर थांबला. मात्र, शांत ठेवले. त्यामुळे त्याला चेंडू बारकाईने पहाता आला आणि त्याच्या हात-डोळ्याच्या समन्वयाने काम करू दिले. यामध्ये त्याच्या वेगवान बॅटचाही हातभार होता.
खेळाच्या वेगवेगळ्या स्वरूपात आणि खेळाच्या टप्प्यांसाठी वेगवेगळे फूटवर्क आवश्यक असतात. मात्र, कधीकधी कोणताही नो फूटवर्क तुम्हाला महानही बनवतो.’
याआधी देखील सचिनने या खेळीनंतर त्याचे कौतुक करताना मी पाहिलेली ही सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले होते.
(Sachin Tendulkar Special Post For Glenn Maxwell Inning Against Afghanistan)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच