---Advertisement---

Video: तब्बल 24 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज

Sachin Tendulkar Stumping
---Advertisement---

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 100 शतकांचा विक्रम असो किंवा सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम असो, सचिन तेंडुलकर सर्वोच्च स्थानी आहे. परंतु, त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत एक गोष्ट अशी होती की, जी फक्त एकदाच घडली. जो एक मोठा विक्रम आहे. (Sachin Tendulkar )

सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतकं झळकावणारा खेळाडू आहे. तसेच त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण 200 कसोटी सामने खेळले. या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत तो केवळ एकदाच यष्टीचीत झाला होता. त्यानंतर तो कधीच यष्टीचीत झाला नाही. तो 21 डिसेंबर, 2001मध्ये यष्टीचीत झाला होता. त्यानंतर कुठल्याही संघाविरुद्ध तो यष्टीचीत झाला नाही. (Sachin Tendulkar stumping video)

इंग्लंड संघ 2001 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता (England vs India). या दौऱ्यावर 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला होता, तर दुसरा सामना अनिर्णीत राहिला होता. तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 336 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघातील फलंदाज एका पाठोपाठ माघारी परतले होते.

त्यावेळी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकर 90 धावा करत खेळपट्टीवर टिकून होता. तर झाले असे की, इंग्लंड संघाकडून 73वे षटक टाकण्यासाठी एश्ले गिल्स गोलंदाजीला आला होता. याच षटकातील पाचव्या चेंडूवर सचिन तेंडुलकर पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षक जेम्स फोस्टरच्या हातात गेला. त्यावेळी जेम्स फोस्टरने क्षण ही न दवडता त्याला यष्टीचीत केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सचिन तेंडुलकर यावेळी पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीचीत झाला होता. त्यानंतर त्याने 12 वर्ष क्रिकेट खेळले. तसेच 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तो कसोटी क्रिकेटमध्ये केवळ एकदाच यष्टीचीत होऊन बाद झाला होता. पावसामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. ही मालिका भारतीय संघाने 1-0 ने आपल्या नावावर केली. तसेच सचिन तेंडुलकरची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद
इतर संघांनीही पाकिस्तान दौरा केला पाहिजे! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---