भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत यशस्वी होण्याचा मंत्र भारतीय फलंदाजांना दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांसाठी फ्रंट फूट डिफेन्स (Front Foot Defence) हा सर्वात महत्त्वाचा घटक असेल, असे तेंडुलकरने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीबद्दल दोन्ही फलंदाजांचे कौतुक केले. सचिन म्हणाला की, मी नेहमी म्हणत आलो आहे की, दक्षिण आफ्रिकेत फ्रंट फूट डिफेन्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या दौऱ्यातही हाच महत्त्वाचा घटक असणार आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या २५ षटकांमध्ये हा फॉर्म्युला वापरणे आवश्यक आहे. (India Tour Of South Africa)
वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्याशी बोलताना सचिन तेंडुलकर की, “आपण इंग्लंड दौऱ्यावर पाहिले की केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचा फ्रंट फूट डिफेन्स भक्कम होता. त्यामुळेच ते धावा करण्यात यशस्वी ठरले.” इंग्लंड दौऱ्यातील रोहित आणि राहुलच्या कामगिरीचे उदाहरण देत सचिनने हात शरीराजवळ ठेवण्याचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, “जेव्हा तुमचे हात तुमच्या शरीरापासून दूर जाऊ लागतात, तेव्हा तुम्ही हळूहळू पण निश्चितपणे नियंत्रण गमावू लागता. या दोन्ही फलंदाजांची खासियत होती की त्यांचे हात दूर जात नव्हते.”
सचिनने सांगितले की, “अनेकदा चेंडू माझ्या शरीरावर लागला. प्रत्येक फलंदाजाच्या बाबतीत हे घडते. गोलंदाज विकेट घेण्यासाठी मैदानावरवर येत असतो. त्यामुळे ते पूर्ण जोर लावून गोलंदाजी करतात. परंतु, जेव्हा तुमचा हात तुमच्या शरीरापासून दूर जाऊ लागतो तेव्हा चेंडू बॅटची कड घेण्याची शक्यता असते. त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकतो.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा कसोटी सामना ३ जानेवारी आणि ११ जानेवारीला खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी
“आम्हाला आयपीएल खेळायचेय”; चक्क विदेशी महिला क्रिकेटपटूंनी मांडले गाऱ्हाणे