---Advertisement---

“आम्हाला आयपीएल खेळायचेय”; चक्क विदेशी महिला क्रिकेटपटूंनी मांडले गाऱ्हाणे

womens-ipl
---Advertisement---

भारतात महिला क्रिकटेचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेट (Indian Women’s Cricket Team) संघाने मागच्या काही वर्षात जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात अनेकदा महिला आयपीएल ( Womens IPL)आयोजित करण्याविषयी चर्चा होत असते. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप कसलेच ठोस पाऊल उचलेले नाही. त्याचवेळी बीसीसीआयकडून भारतीय महिला क्रिकेटपटूंसह विदेशी महिला क्रिकेटपटूंना देखील अपेक्षा आहेत. त्यातच आता न्यूझीलंडच्या प्रमुख महिला क्रिकेटपटूंनी महिला आयपीएलबाबत आशावाद व्यक्त केला आहे.

सुरु व्हावी महिला आयपीएल
महिलांसाठी आयपीएल सुरू व्हावी, याबाबत न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन (Sophie Divine) हिने आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,
“ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीगची (WBBL) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील काही दर्जेदार महिला क्रिकेटपटू त्या ठिकाणी खेळण्यासाठी आल्या. हा एक शानदार अनुभव होता. मला महिला आयपीएल झालेली पाहायला आवडेल. आंतरराष्ट्रीय पटलावर महिला क्रिकेटला नेण्यासाठी ते एक चांगले व्यासपीठ ठरेल.”

डिवाइन प्रमाणेच न्यूझीलंड संघाची प्रमुख फलंदाज सुझी बेट्स (Suzi Bates) हिनेदेखील याबाबत आपले मत नोंदवले. ती म्हणाली,
“मी सोफीच्या म्हणण्याशी सहमत आहे. फ्रॅंचाईजी क्रिकेटमुळे महिला क्रिकेटमध्ये बराच बदल घडलाय. मला वाटते की, यामुळे व्यवसायिक महिला क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळेल. ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश व इंग्लंडमधील द हंड्रेड (The Hundred) नंतर भारतात महिला क्रिकेटसाठी मोठे पाऊल उचलले जाऊ शकते.”
न्यूझीलंडची युवा अष्टपैलू एमिलिया केर (Amelia Kerr) हिने देखील आपल्या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या सुरात सूर मिसळला. भारतात क्रिकेटविषयी प्रचंड प्रेम असून, महिला आयपीएल झाल्यास हा एक शानदार अनुभव असेल, असे तिने म्हटले.

यापूर्वी खेळले गेले प्रदर्शनीय सामने
भारतात महिला आयपीएल सुरू झाली नसली तरी २०१८, २०१९ व २०२० मध्ये वुमेन्स टी२० चॅलेंज (Womens T20 Challenge) ही छोटेखानी स्पर्धा आयपीएलच्या दरम्यान खेळवली जात होती. पहिल्या वर्षी केवळ एक प्रदर्शनीय सामना झाल्यानंतर, पुढील दोन हंगामात काही इतर सामने देखील खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये जगभरातील मातब्बर महिला क्रिकेटपटूने सहभाग नोंदविला होता. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

वडिल नाही बनू शकले क्रिकेटर, म्हणून उघडले किराणा दुकान; आता मुलाची थेट ‘टीम इंडिया’त निवड

भारीच ना!! स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या महिला प्रेक्षकाने टिपला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

‘तीच गल्ली, तेच लोक, तेच प्रेम…’, आपल्या जन्मगावी पोहोचलेला कैफ जुने दिवस आठवून झाला भावुक

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---