---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ १० भारतीय फलंदाजांच्या नावावर आहेत सर्वाधिक कसोटी धावा

---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ज्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ७ कसोटी मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये अवघ्या ३ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत अजुनपर्यंत एकही कसोटी मालिका जिकंता आली नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघाला असणार आहे.(top 10 highest scorers against South Africa in test)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात असे अनेक मातब्बर फलंदाज आहेत, जे धावांचा डोंगर उभारू शकतात. ज्यामध्ये केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. अशातच कोण असेल तो फलंदाज तो सर्वाधिक धावा करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टॉप १० भारतीय फलंदाज.

१)सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)- भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण २५ कसोटी सामने खेळले. ज्यामधील ४५ डावात त्याने १७४१ धावा केल्या. तसेच त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण ७ शतक झळकावले.

२) वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag): वीरेंद्र सेहवाग हा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. वीरेंद्र सेहवागने १५ कसोटी सामन्यात १३०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ शतक झळकावले.

३) राहुल द्रविड (Rahul Dravid): भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना एकूण १२५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले.

४) विराट कोहली(Virat Kohli) : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना १२ कसोटी सामन्यात १०७५ धावा धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे.

५) वीवीएस लक्ष्मण(VVS Laxman) : वीवीएस लक्ष्मणने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण १९ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ९७६ धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याला एक शतक करण्यात यश आले आहे.

६) सौरव गांगुली (Sourav Ganguly) : सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण १७ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याला ९४७ धावा करण्यात यश आले. यादरम्यान त्याने ७ अर्धशतक झळकावले.

७) मोहम्मद अझहरुद्दिन(Mohammad Azharuddin): भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दिन यांनी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण ११ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ७७९ केल्या. यादरम्यान त्यांनी ४ शतक देखील झळकावले होते.

८) चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara)  : भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ७५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक झळकावले आहे.

९) अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) : भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध १० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ७४८ धावा करण्यात यश आले आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ३ शतक झळकावले आहेत.

१०) रोहित शर्मा(Rohit Sharma) : रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ९ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ६७८ धावा करण्यात यश आले आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकूण ३ शतक झळकावले आहे. त्याची या दौऱ्यावर निवड करण्यात आली होती. परंतु दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

काय रे हे? याकेवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी

तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---