---Advertisement---

विश्वचषक २०१९: खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेटच्या या क्षेत्रात पदार्पण करतोय सचिन तेंडुलकर!

On: गुरूवार, मे 30, 2019 1:27 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आजपासून(30 मे) सुरु होणाऱ्या आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकातून समालोचक म्हणून पदार्पण करणार आहे. या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आज होणाऱ्या सलामीच्या सामन्यात समालोचन करणार आहे.

तो स्टार स्पोर्ट्सवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हिंदी आणि इंग्लिंशमध्ये होणाऱ्या फिलिप ह्यू क्रिकेट लाईव्ह प्री-मॅच शोमध्ये त्याच्या स्वत:च्या ‘सचिन ओपन्स अगेन’ या सेगमेंटमध्ये दिसणार आहे.

त्याच्याबरोबर काही क्रिकेट तज्ञही यात सामील होणार आहेत. या तज्ञापैकी काहीजण सचिन बरोबर क्रिकेट खेळले आहेत.

6 विश्वचषक खेळलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. तो विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

त्याने विश्वचषकात 45 सामने खेळताना 2287 धावा केल्या आहेत. तसेच 2003 च्या विश्वचषकामध्ये त्याने 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या. या 673 धावा एका विश्वचषकात एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

तसेच सचिन हा  2011 मध्ये विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचाही सदस्य होता. हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता.

2019 च्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साऊथँम्पटनला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडचा हा गोलंदाज म्हणतो, ‘मी भारतीय असतो तर इशांत शर्मा झालो असतो’

विश्वचषकादरम्यान विराटबरोबर फोटो काढण्याची चाहत्यांना रोज मिळणार संधी, जाणून घ्या कारण

६० सेकंड्स चॅलेंजसह असा पार पडला २०१९ विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment