‘शारजा’ म्हटलं की सर्वांना आठवतो तो, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील अविस्मरणीय सामना आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वादळी खेळी. २२ वर्षांपुर्वी २२ एप्रिल १९९८ला संयुक्त अरब अमिरातीतील शारजात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कोका कोला चषकातील सामना झाला होता. यावेळी सचिनने केलेल्या शतकी खेळीसाठी हा सामना प्रसिद्ध आहे.
सचिनने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात या सामन्याविषयी एक खुलासा केला आहे. खरं तर सचिन हा भारतीय क्रिकेट इतिहासातील शांत आणि धैर्यवान क्रिकेटपटू आहे. पण, या सामन्यादरम्यान सचिन आपला संघसहकारी व्हीव्हीएस लक्ष्मणवर वैतागला होता.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. दरम्यान आलेल्या वादळामुळे भारताला ४६ षटकात २७६ धावा करायच्या होत्या. याविषयीच्या आठवणी ताज्या करत सचिन म्हणाला की, “मला आठवते सामन्यादरम्यान मी माझ्या भावनांना सांभाळण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मी लक्ष्मणला ओरडत म्हणालो की, आपल्याला २ धावा घ्यायच्या आहेत, पळ, तूू पळत का नाहीयेस?”
सचिन आणि लक्ष्मणने त्या सामन्यात ५व्या विकेटसाठी १०४ धावांची भागिदारी केली होती. भारताला विजयासाठी २० चेंडूत केवळ ३४ धावांची गरज असताना सचिन १३१ चेंडूत १४३ धावा करुन बाद झाला. त्यानंतर पुढे भारताला केवळ ८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ४६ षटकात ५ बाद २५० धावांवर संपुष्टात आला. तो सामना ऑस्ट्रेलियाने २६ धावांनी जिंकला होता. तरीही, रन रेटच्या आधारावर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता.
सचिनला वाटले होते की, आपल्या चमकदार कामगिरीवर भाऊ अजित तेंडुलकर खुश असणार आणि तो मला शुभेच्छा देईल. पण सगळ काही याउलट झालं. सचिनला अजितचे खूप बोलणे ऐकावे लागले. Sachin Tendulkar’s brother shouted him for being angry on vvs laxman in sharjah match
याविषयी बोलताना सचिन म्हणाला, “जेव्हा मी घरी गेलो. तेव्हा मला भावाचे खूप बोलणे ऐकावे लागले होते. तो मला म्हणाला होता की, या छोट्या छोट्या गोष्टी अशा समोर नाही आल्या पाहिजेत. लक्ष्मण तुझा साथीदार आहे. तो पण संघासाठी खेळत होता. तो फक्त तुझ्या एकट्याचा सामना नव्हता. तोही तुझ्यासोबतच खेळत होता.”
या सामन्यानंतर सचिनने पुन्हा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते आणि भारताने हा सामना जिंकला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
गांगुलीला बीसीसीआयचा गाडा हाकण्यासाठी मिळणार हा डेप्युटी, आहे क्रिकेट प्रशासनाचा…
चाहत्याची मागणी पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधाराने…
कसोटी क्रिकेटमधील आजपर्यंतची सार्वकालिन आयसीसी क्रमवारी,…