---Advertisement---

‘वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीज’ आधी युवी आणि सचिन जपतायेत स्वतःची सेफ्टी, पाहा भन्नाट फोटो

On: मंगळवार, मार्च 2, 2021 11:07 PM
---Advertisement---

‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ २०२१ पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होईल. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा अर्ध्यावर स्थगित करावी लागली होती. शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) आयोजकांनी या स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे सगळे सामने रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवले जातील.

या स्पर्धेसाठी सगळे संघ रायपुरमध्ये दाखल देखील झाले आहेत. सामन्याआधी या संघातील खेळाडू कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार आपापल्या हॉटेल क्वारंटाईन झाले आहेत. या काळातील त्यांचे फोटो आता समोर येत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

सचिन-युवराजचा फोटो होतोय व्हायरल 

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर या स्पर्धेत आपल्या जुन्या संघ सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ या स्पर्धेत तो इंडिया लिजेंड्स या संघाकडून वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान या आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत खेळतांना दिसेल. या सामन्यांपूर्वी तो संघासह हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाला आहे.

याचवेळेचा त्याचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतो. सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगचा पीपीई कीट मधला एक फोटो युवराजने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच “आम्ही रायपुर मध्ये पोहोचलो आहोत रोड सेफ्टी सिरीजसाठी. रोड सेफ्टीसोबतच आपली सेफ्टी पण महत्वाची आहे”, अशी कॅप्शन देखील दिली आहे.

दरम्यान, या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता इंडिया लिजेंड्स आणि बांग्लादेश लिजेंड्स या संघांमध्ये खेळवला जाईल. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या स्पर्धेचे उद्घाटन करतील. या स्पर्धेत सचिन तेंडुलकरसह, तिलकरत्ने दिलशान, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, खालिद महमूद, केव्हिन पीटरसन असे विविध देशांतील दिग्गज सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहने का घेतली माघार? खरे कारण आले समोर

स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल, एकदा व्हिडिओ पाहाच

आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ही आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---