क्रिकेट जगतात भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीज संघाचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा हे दोन खेळाडू आपल्या फलंदाजीमुळे खूप चर्चेत राहिले होते.
लाराने (Brian Lara) आपल्या कसोटी कारकीर्दीत सर्वोच्च ४०० धावांंची तूफान खेळी केली. तर सचिनने (Sachin Tendulkar) वनडे आणि कसोटी असे दोन्ही क्रिकेट प्रकारात मिळून शतकांचे शतक करण्याचा मान मिळविला होता.
सचिन आणि लारा या दोन दिग्गजांचा सामना करणे कोणत्याच गोलंदाजासाठी सोपी गोष्ट नव्हती. परंतु या दोघांपैकी कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करून बाद करणे कठीण आहे, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने (Jason Gillespie) दिले आहे.
काऊ कॉर्नर क्रॉनिकल्सला (Cow Corner Chronicles) दिलेल्या मुलाखतीत सिडनीमध्ये जन्मलेला गिलेस्पी म्हणाला की, “सचिन आणि लारा हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत. दोघांची खेळण्याची शैली वेगळी होती. मला नेहमी वाटते की, सचिनची विकेट घेणे कठीण आहे. कारण तो लारासारखे मोठे फटके खेळत नव्हता. तो नेहमी बचावात्मक खेळी खेळत होता.” Hard to take wicket of Sachin Tendulkar
जेसन पुढे म्हणाला की, “हे दोन्ही खेळाडू शानदार आहेत. या दोघांना आता गोलंदाजी करावी लागणार नाही. याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की मी तुमच्या समोर बसून हे सांगतोय की, मी सचिन आणि लारा यांसारख्या गोलंदाजांना गोलंदाजी केली आहे.”
सचिन आणि लारा या दोघांमध्ये वेगवेगळे कौशल्य होते. हे दोघेही आपल्या पिढीतील सर्वात क्रिकेटपटूंपैकी एक होते. तसेच जागतिक क्रिकेटमधील प्रत्येक परिस्थितीचा त्यांनी सामना केला आहे. इतकेच नव्हे तर २००७ विश्वचषकानंतर लाराने निवृत्ती घेतली. त्यानंतर सचिनने २०१३मध्ये मुंबई येथे वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेतली होती.
जेसनने ऑस्ट्रेलियाकडून नोव्हेंबर १९९६ ते एप्रिल २००६ पर्यंत १० वर्ष क्रिकेट खेळले. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ७१ कसोटी सामने, ९७ वनडे सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. यामध्ये त्याने कसोटीत २५९ आणि वनडेत १४२ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२०त त्याला १ विकेटवरच समाधान मानावे लागले.
त्याने ऑस्ट्रेलियाकडून २००६मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे खळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार