---Advertisement---

सचिन तेंडुलकरने दुखापतग्रस्त रिषभ पंतचं मनोबल वाढवलं, वसीम जाफरनेही त्याच्या शौर्याचं केलं कौतुक!

On: गुरूवार, जुलै 24, 2025 9:59 PM
---Advertisement---

भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील (Anderson Tendulkar Trophy) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रिषभ पंतने (Rishbh Pant) दुखापतग्रस्त पायाने खेळून केलेल्या धैर्यशील अर्धशतकाचे कौतुक केले.

मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंत मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्याच्या उजव्या पायाच्या पाचव्या मेटाटार्सल हाडाला दुखापत झालेली होती. पहिल्या दिवसाच्या खेळात ही दुखापत झाली होती. पंत जेव्हा शार्दुल ठाकूर 41 धावांवर बाद झाल्यानंतर लंगडत-लंगडत फलंदाजीसाठी परत आला, तेव्हा ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

रिषभ पंत धावताना स्पष्ट त्रासात दिसत होता आणि त्याला सिंगल घेणंही कठीण जात होतं, तरीही त्याने दु:ख झेलत 54 धावा केल्या आणि भारताचा स्कोअर 358 धावांपर्यंत नेला.

पंतने दुखापतीनंतर पुनरागमन करून ज्या प्रकारे खेळ केला, त्याने कमालीची जिद्द आणि चिकाटी दाखवली. त्याचं अर्धशतक म्हणजे देशाचं प्रतिनिधित्व करताना लागणाऱ्या संयम आणि निश्चयाची साक्ष आहे. हे धाडसी खेळी नेहमीच आठवणीत ठेवली जाईल. शाब्बास रिषभ!

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही पंतच्या धैर्याची प्रशंसा करत ट्विटरवर लिहिलं, संघासाठी खेळणारा खरा टीम मॅन. खूप धाडसी प्रयत्न. शाब्बास रिषभ पंत! परिस्थिती पाहता भारताने छान धावसंख्या उभारली आहे.

पंतला ही दुखापत पहिल्या दिवसाच्या 68व्या षटकात क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात झाली. त्याच्या पायाला सूज आली आणि रक्तस्रावही झाला. त्यामुळे तो 37 धावांवर खेळत असतानाच रिटायर्ड हर्ट झाला. बीसीसीआयने स्पष्ट केलं की, उर्वरित सामन्यात ध्रुव जुरेल याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल, तर पंत संघाच्या गरजेनुसार फक्त फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---