सध्या सर्वत्र आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम आहे. मात्र, क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विश्वचषकाचा 30वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर रंगला. यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात आमना-सामना झाला. यादरम्यानच ही बातमी येऊन धडकली. श्रीलंका संघाने 30 ऑक्टोबर रोजी आपला सर्वात मोठा चाहता म्हणजेच अंकल पर्सी यांना कायमचे गमावले आहे.
सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) अंकल पर्सी यांचे निधन (Uncle Percy Death) झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी कोलंबो येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अंकल पर्सी हे मागील 40 वर्षांपासून श्रीलंका संघाच्या प्रत्येक सामन्याला स्टेडिअममध्ये हजेरी लावत होते. मात्र, बऱ्याच काळापासून आजारी असलेल्या अंकल पर्सी (Uncle Percy) यांनी जगाचा निरोप घेतला. अशात त्यांच्या निधनावर चाहत्यांपासूनच ते आजी-माजी खेळाडूंपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना कोणत्याही स्टेडिअममध्ये देशाचा झेंडा घेऊन संघाला पाठिंबा देण्याची परवानगीही दिली होती. एवढंच नाही, तर त्यांना प्रत्येक क्रिकेटपटू ओळखत असावा. ते ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी जायचे. अंकल पर्सी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचेही मोठे चाहते होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ जेव्हा श्रीलंकेत होता, तेव्हा अंकल पर्सी आजारी होते. यावेळी रोहित त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचला होता.
अंकल पर्सी यांच्या निधनानंतर श्रीलंकेचा माजी सलामी फलंदाज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यानेही दु:ख व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट (एक्स) करत लिहिले आहे की, “जड अंत:करणाने म्हणावे लागत आहे की, आपले प्रिय अंकल पर्सी आता जगात राहिले नाहीत. तुम्ही पहिले सुपरफॅन होता आणि आम्हा सर्वांसाठी तुम्ही नेहमी खास राहाल.”
https://twitter.com/Sanath07/status/1718969045926686877?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718969045926686877%7Ctwgr%5E7a5371aadb4e3e8f2752e240d9508fbbb3d34a89%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket-hindi.html
याव्यतिरिक्त माहेला जयवर्धने यानेही ट्वीट करत पर्सी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
Uncle Percy was the true 12th man for many generations of Sri Lankan cricketers. He was there throughout my entire career, cheering us on, waving his flag and always, win or lose, making us laugh. He really loved his cricket and he was also a wonderful person. We will all miss… pic.twitter.com/d485JwbCx2
— Mahela Jayawardena (@MahelaJay) October 30, 2023
श्रीलंकेचे विश्वचषकातील प्रदर्शन
श्रीलंका संघाचे विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रदर्शन पाहायचे झालं, तर ते तितके खास नाहीये. त्यांना सहाव्या सामन्यात अफगाणिस्तानने 7 विकेट्सने पराभूत केले. अशात आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. तसेच, 4 सामने गमवावे लागले आहेत. त्यांचे सध्या 4 गुण असून ते पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी घसरले आहेत. (sad news afg vs sl world cup 2023 sri lanka team biggest supporter uncle percy passed away)
हेही वाचा-
धक्कादायक! राष्ट्रगीत सुरू असतानाच मेंडिसपुढे उभा असलेला मुलगा झालेला बेशुद्ध, दोन्ही संघांचे खेळाडू हैराण
ईडन गार्डन्सवर द.आफ्रिकेशी भिडणार 70 हजार विराट! कॅब करणार कोहलीच्या ‘बर्थ डे’चे जंगी सेलिब्रेशन