क्रिकेट जगतासाठी अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. अमोल काळे हे सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर गेले होते. सामना संपल्यानंतर अमोल काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 47 व्या वर्षी काळे यांची प्राणज्योत मालवली, त्यांचे अचानक जाण्याने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून अमोल काळेंची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षीच निवड झाली होती. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ते खूप निकटवर्तीय होते. अमोल काळे नागपूरकर असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. 2014 मध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच अमोल काळेंकडे फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून पाहिलं जात होतं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष होते.
महत्तवाच्या बातम्या-
“तुम्ही कोणीही असला तरी असं करु शकत नाही…” गावसकरांचा सिराजला टोला
राखीव खेळाडूंनी लूटला चाहत्यांप्रमाणेच भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद
पाकिस्तानच्या ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्याच्या आशा अजूनही जिवंत!