कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत सध्या कबड्डीचे सामने देखील स्थगित झाले आहेत. अशा परिस्थित खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. असेच “कबड्डीच्या कुरुक्षेत्रातील महाराष्ट्राचे योध्दे” या फेसबूक लाईव्ह कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी वरिष्ठ कबड्डीपटू सदानंद शेट्ये उपस्थित होते.
सदानंद शेट्ये हे कबड्डीमधील पहिले अर्जून पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. त्यांना १९७२ ला अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या पुरस्कारांच्या आठवणी त्यांनी फेसबूक लाईव्हवेळी सांगितले.
त्यांना माजी कबड्डीपटू राजू भावसार आणि शांताराम जाधव यांनी अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विचारले. यावेळी शेट्ये यांनी अर्जून पुरस्कारानंतर केलेल्या सेलिब्रेशनबद्दल सांगितले की, ‘मला जोरदार प्रतिक्रिया मिळाली. माझे मित्र आणि पिंपरी चिंचवडचे महापौर नाना शितोळे यांनी मला पहिल्याच दिवशी फोन करुन सांगितले की उद्या इकडे यायचे, तूमच्यासाठी मोठी पार्टी ठेवली आहे. त्यानंतर पुण्यात डेक्कनला मोठी पार्टी दिली. त्यांच्याकडे माझे जाणे-येणे होते. आमची चांगली ओळख होती. तेव्हा पहिली पार्टी पुण्यातच झाली.’
शेट्ये यांनी कबड्डीतून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांने रेल्वे संघाचे प्रशिक्षणपद सांभाळले.
महत्त्वाच्या बातम्या –
-मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
-मनजीत सारखा ब्लॉक करायचा आहे, तर ‘या’ गोष्टी कराव्या लागतील
-अशी आहे मनजीत चिल्लरची ड्रीम टीम; स्वत:लाही दिले स्थान