---Advertisement---

कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 8:18 PM
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे मंगळवारी (१५ सप्टेंबर) कोल्हापूर येथे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी पहाटे ४ च्या आसपास अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नीव्यतिरिक्त २ मुली आहेत.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाचे माजी पदाधिकारी रमेश कदम यांनी पीटीआयला सांगितले की, “पाटील यांचा कोल्हापूर येथे रुईकर कॉलनीमध्ये आपल्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे झोपेत निधन झाले आहे.”

पाटील यांनी १९५५-५६ दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध केवळ एका सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांनी नाबाद १४ धावांची खेळी केली होती. यानंतर त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

बीसीसीआयनेही पाटील यांच्या निधनानंतर ट्वीट करत माहिती दिली आहे.

पाटील यांनी १९५२-६४ दरम्यान महाराष्ट्रासाठी ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८६६ धावा केल्या. या धावा करताना त्यांनी ३ अर्धशतकेही ठोकली. सोबतच गोलंदाजी करताना ८६ विकेट्सही घेतल्या. त्यांनी रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’

एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित

-रोहित शर्मा म्हणतोय, भावा! तू लवकरच भारताकडून खेळणार क्रिकेट

ट्रेंडिंग लेख-

-सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार

-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश

-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---