पुणे। पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या नव्या मोसमातील लीगमध्ये आज साई स्पोर्टस, बेटा अ आणि लौकिक एफए संघांनी पूर्ण गुण जरूर मिळवला. पण, त्यासाठी त्यांना प्रतिस्पर्ध्यांचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.
ब गटातील सामन्यात साई स्पोर्ट्सने व्हिन्सेंट ओल्ड बॉईज संघटनेचा १-० असा पराभव केला. सामन्याच्या २८व्या मिनिटाला सतिश भोईटेने हा एकमात्र गोल नोंदवला. त्यानंतर सी गटात लौकिक एफए संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल करताना इनव्हेडर्सचा २-० असा पराभव केला. आशुतोष कांबळे याने प्रथम १०व्या, तर रोहन सुनारने ४९व्या मिनिटाला गोल केला.
बेटा अ संघाने पूना सोशल संघटना संघाचा २-१ असा पराभव केला. सामन्यातील तीनही गोल उत्तरार्धात झाले. सी गटातील या सामन्यात पुर्वार्ध कंटाळवाणा झाला. एकालाही गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या उत्तरार्धात ४३व्या मिनिटाला पहिला गोल आशुतोष धनवाड याने बेटा अ साठी केला. त्यानंतर पाचच मिनिटांनी आदित्य आवटेने त्यांची आघाडी वाढवणारा गोल केला. सामन्याच्या ५५व्या मिनिटासला फुरकन शेख याने गोल करून पूना सोशलसाठी पिछाडी भरून काढली.
त्यापूर्वी अ गटातील सामन्यातच गॅलाक्टिक संगाने अखिल भुसारी कॉलनी एफसीचा प्रतिकार २-१ असा मोडून काढला. असिथ चव्हाण याने १४, श्रेयस शेवाटे याने ३७व्या मिनिटाला विजयी संघासाठी गोल केले. पराभूत संघाचा एकमात्र गोल टिमोथी काम याने ४७व्या मिनिटाला केला.
स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटात फन फिटनेस एफए, लौकिक एफए आणि रायझिंग पुणे एफसी संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम राखली. अ गटात फन फिटनेस संघाने व्हिजन स्पोर्टसचा ७-०, ड गटात लौकिकने स्पोर्टिव्ह एफएचा ६-० आणि रायझिंग पुणे एफसी संघाने मॅथ्यू एफएचा ५-० असा पराभव केला.
निकाल-
सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी
गट ब – मोमिनपुरा एफसी पुढे चाल वि. परदेशी एफसी
साई स्पोर्टस १ (सतिश भोईटे २८वे मिनिट) वि. व्हिन्सेंट ओल्ड बॉईज असोशिएशन ०
गट सी – लौकिक एफए २ (आशुतोष कांबळे १०वे, रोहन सुनार ४९वे मिनिट) वि.वि. इनव्हेडर्स ०
बेटा ए २ (आशुतोष धनवाड ४३वे, आदित्य आवटे ४८वे मिनिट) वि.वि. असोशिएशन पुणे सोशल ब १ (फुरकन शेख ५५वे मिनिट)
गट अ – गॅलाक्टिक वॉरियर्स २ (असिथ चव्हाण १४वे, श्रेयस शेवाटे ३७वे मिनिट) वि.वि. अखिल भुसारी कॉलनी एफसी १ (टिमोथी काम ४७वे मिनिट)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एसएसपीएमएस मैदान -१४ वर्षांखालील
गट ब – रायझिंग पुमे एफसी ५ (दुर्वेश महाजन ३०+१ले, ४९वे, वेदांत गुप्ता ३७वने, आर्य देशमुख ४८वे मिनिट) वि.वि. मॅथ्यू एफए ०
गट सी – स्पोर्टिको एफए ३ (यशराज सावंत १३वे, ४९वे मिनिट, विदित बगाडे ५२वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक एफए १ (दर्श बरडे ५८ वे मिनिट)
गट डी – लौकिक एफए ६ (हर्षिसल पांड्या ५वे, चेतन सिंग २३वे, अथर्व इंगवले २४, ४१, ४४वे मिनिट, आदित्य कांबळे ३०वे मिनिट) वि.वि. स्पोर्टिव एफए ०
गट अ – फन फिटनेस एफए ७ (प्रणन शेट्टी १६वे, रचित भटेवरा २१वे, अर्जुन देशपांडे २६, ५०वे, रियान जैन २९, ४१, ४९वे मिनिट) वि.वि. व्हिजन स्पोर्टस: 0.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
देहू फिटर्सला पूना सोशलने झुंजवले
नॉईजी बॉईजच्या मोठ्या विजयात आयुज भुतेचे सहा गोल