ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालने अलीकडेच भारतातील खेळांच्या स्थितीवर मोठे विधान केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर सायना व्यक्त झाली. यावेळी भारतात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य दिले जाते, क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरीही सुधारेल, अशी खंत तिने बोलून दाखवली. दरम्यान सायनाने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आव्हान दिले, ज्याची भरपूर चर्चा होत आहे.
त्याचे झाले असे की, सायना नेहवालने अलीकडेच भारताच्या क्रीडा संस्कृतीत क्रिकेटच्या वर्चस्वाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले होते. सायना म्हणाली होती की, क्रिकेटपेक्षा इतर खेळांना जास्त शारीरिक ताकद लागते. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट विरुद्ध इतर खेळ असा वाद सुरू झाला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी याने सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या 150+ किमी प्रतितास वेगवान चेंडूचा सामना करण्याचे आव्हान सायनाला दिल्याने हा वाद आणखी वाढला. या कमेंटमुळे वाद उफाळून आला आणि त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीला सायनाची माफी मागावी लागली.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 12, 2024
क्रिकेटपेक्षा बॅडमिंटन, टेनिस आणि बास्केटबॉलसारखे खेळ शारीरिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक आहेत, असे नेहवालने महिन्याभरापूर्वी एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते. तिच्या या विधानावरुन क्रिकेट चाहते संतापले होते. यादरम्यान केकेआरचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. अंगक्रिशने एक्स अकाउंटवर लिहिले होते की, “बुमराहने 150 किमी प्रतितास वेगाचा चेंडू सायनाच्या डोक्यावर टाकला तेव्हा ती कशी कामगिरी करते?, ते पाहावे लागेल.” या कमेंटनंतर अंगक्रिशने माफी मागितली आणि आपली पोस्ट केवळ विनोद असल्याचे म्हटले होते.
Unplugged FT. Saina Nehwal
– If other sports get facilities and services like cricket, India will brings Medals like China and USA in every events.
– few were saying I cannot survive Bumrah’s bowling. if he plays Badminton with me, he might not be able to survive my smash. pic.twitter.com/qK2F6nj1Sd
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) August 8, 2024
अंगक्रिशच्या या कमेंटबाबत शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना सायना म्हणाली, “मी जसप्रीत बुमराहला का सामोरे जायचे? जर मी 8 वर्षे खेळत असते तर कदाचित मी जसप्रीत बुमराहला उत्तर दिले असते. जर बुमराह माझ्यासोबत बॅडमिंटन खेळला असता तर कदाचित तो माझ्या स्मॅशचा सामना करू शकला नसता. हेच मला आधी सांगायचे होते की, प्रत्येक खेळ आपापल्यात सर्वोत्कृष्ट आहे. क्रिकेट, बॉलीवूड सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, पण आपण इतर खेळांनाही महत्त्व दिले पाहिजे. नाहीतर मग आपण क्रीडा संस्कृती कुठून आणणार?.”
महत्त्वाच्या बातम्या-
3 संघ ज्यांना आयपीएल 2025 पूर्वी आपले मुख्य प्रशिक्षक बदलण्याची आवश्यकता
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!