पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत पाकिस्तान संघाने सध्या २-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ८ गडी बाद करणारा साजिद खान आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
क्रिकेटमध्ये गडी बाद केल्यानंतर शतक पूर्ण केल्यानंतर किंवा झेल टिपल्यानंतर खेळाडू आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना दिसून येत असतात. प्रत्येक खेळाडूची सेलिब्रेशन करण्याची पद्धत ही वेगळी असते. अशातच पाकिस्तान संघाचा फिरकीपटू साजिद खान देखील हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने झेल टिपल्यानंतर शड्डू ठोकून सेलिब्रेश केले. हे सेलिब्रिशन क्रिकेटमध्ये गब्बर स्टाईल सेलिब्रेशन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कारण, ही सेलिब्रेशन स्टाईल भारतीय दिग्गज फलंदाज शिखर धवनमुळे सर्वाधिक चर्चेत आली आहे. शिखर धवन जेव्हा झेल टिपतो तेव्हा, असे शड्डू ठोकून सेलिब्रेशन करत असतो.
पाकिस्तान संघाने पहिल्या डावात उभारला ३०० धावांचा डोंगर
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून कर्णधार बाबर आजमने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली, तर अजहर अलीने ५६ धावांचे योगदान दिले. पाकिस्तान संघाने पहिला डाव ४ बाद ३०० धावांवर घोषित केला.
Just check the jubilation style of #SajidKhan after taking the wicket 👏#PakvsBan pic.twitter.com/bttdfgCt3O
— Ali Arsalan I علی ارسلان (@arsalangorsi) December 7, 2021
पाकिस्तान संघाचा डावाने विजय
पाकिस्तान संघाच्या ३०० धावांचा पाठलाग करताना शाकिब अल हसनने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर नजमुल शांतोने ३० धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ८७ धावांवर संपुष्टात आला होता.
त्यानंतर पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला फॉलो ऑन दिला होता. त्यानंतर बांगलादेश संघाला दुसऱ्या डावात सर्वबाद २०५ धावाच करण्यात यश आले. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना १ डाव आणि ८ धावांनी जिंकला. दुसऱ्या डावातही साजिद खानने ४ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
“भारताकडे यावेळी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात हरवण्याची सुवर्णसंधी”
ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”