---Advertisement---

तो मुलगा नक्की कोण? धोनीच्या व्हायरल झालेल्या जून्या फोटोवर चाहत्यांना पडला प्रश्न 

On: शनिवार, मे 29, 2021 3:27 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जरी सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय नसतो. पण त्याची पत्नी साक्षी धोनी ही नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट टाकत असते. तिने केलेल्या पोस्टमधून कधी धोनी आपल्या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवताना दिसतो, तर कधी आपल्या ६ वर्षाच्या मुलीसह खेळताना दिसतो. पण नुकताच त्याला एक जुना फोटो साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी दोन मुलांसह क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळीही तो यष्टीरक्षण करतानाच दिसत आहे. या फोटोवर धोनीच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. अनेकांनी ‘दिल’च्या इमोजीही शेअर केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPYQasRHPBD/

पण याबरोबरच या फोटोत दिसणारे लहान मुले कोण असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या फोटोत दिसणारा एक मुलगा कबीर बाहिया आहे. कबीर हा धोनी कुटुंबाच्या जवळचा सदस्य असल्याचे म्हटले जाते. पण तो नक्की कोण आहे, याबद्दल अजूनपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून धोनी दांपत्य त्याला ओळखतात. तसेच त्यांच्या अनेक पोस्टमधूनही तो दिसून येतो.

https://www.instagram.com/p/CH3Fq9JHy-9/

अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान देखील त्याला धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देताना पाहाण्यात आले आहे. पण तो नक्की कोण आहे, हे माहित नसल्याने अनेकदा चाहते त्याबद्दल विचारत असतात. असे म्हटले जाते की कबीर हा इंग्लंडचा रहिवासी असून त्याचे वडीलांचा तिथे मोठा व्यावसाय आहे. तसेच कबीरची धोनी दांपत्याशी खूप चांगली मैत्री आहे. तो २०११ विश्वचषकावेळीही साक्षीसह व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेला दिसून आला होता.

https://www.instagram.com/p/CHv0FgWnw7L/

धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. पण काहीदिवसांपूर्वी आयपीएलचा १४ वा हंगाम २९ सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आला होता. हा उर्वरित हंगाम आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएई येथे पार पडेल. त्यामुळे आता चाहत्यांना धोनीला पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळताना पाहाता येणार आहे.

या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने चांगली कामगिरी केलेली आहे. हंगाम स्थगित झाला, तेव्हा चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते.

महत्त्वाच्या बातम्या –

पंत-धोनीच्या तुलनेचे सत्र सुरूच; बालपणीचे प्रशिक्षक संतापून म्हणाले, ‘सतत त्यांची तुलना कशाला?’

बिग ब्रेकिंग! आयपीएल २०२१चे राहिलेले सामने होणार ‘या’ देशात, बीसीसीआयने शनिवारी घेतला निर्णय

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---