काल झालेल्या आयपीएल 2020च्या पहिल्या सामन्यात चेन्नई संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले. चेन्नई संघाकडून अष्टपैलू सॅम करनने उत्कृष्ट फटकेबाजी केली. त्याच्या डावामुळे सामन्यात बराच फरक पडला. सॅम करनने या बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, “मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीने मला त्याच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले या निर्णयामुळे मी आश्चर्यचकित झालो होतो.”
22 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सीएसकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. प्रभावी गोलंदाजीनंतर करनने केवळ सहा चेंडूत 18 धावा करून संघाला लक्ष्य गाठण्यास मदत केली. अष्टपैलू रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनीने करनला फलंदाजीसाठी पाठवून सर्वांना चकित केले. त्यावेळी संघाला 17 चेंडूत 29 धावांची गरज होती.
करन सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात म्हणाला, “खरे सांगायचे तर मला आश्चर्य वाटले की मला फलंदाजीसाठी पाठवले गेले. धोनीमध्ये एक अलौकिक बुद्धिमत्ता आहे आणि अर्थातच त्याने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असावा. आम्ही 18 वे षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला लक्ष्य केले आणि एकतर बाद होऊ किंवा षटकार मारू या मानसिकतेसह खेळलो.”
यूएईतील परिस्थितीबद्दल बोलतांना तो म्हणाला, “इथली परिस्थिती अगदी भिन्न आहे. मला इंग्लंड संघाबरोबर जैव सुरक्षित वातावरणात राहण्याची सवय झाली होती. आयपीएलला मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहण्याची सवय झाली असती पण यावेळी तस होणार नाही कारण आम्ही रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणार आहोत. मी बर्याच लोकांना भेटलो नाही. एक दिवस आधी आलो आणि नंतर थेट संघाच्या बसमध्ये बसलो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्त झालो म्हणून हलक्यात घेऊ नका; या खेळाडूच्या खेळीने दिला संदेश
-सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-चेन्नईच्या ‘या’ ५ खेळाडूंनी चारली मुंबईला धूळ, ३६ वर्षीय खेळाडूने केले नेत्रदिपक प्रदर्शन
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा