Sameer Rizvi on IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2024 लिलावात 6 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यात दुसरा सर्वात महागडा 20 वर्षीय फलंदाज समीर रिझवी हा होता. या पठ्ठ्यावर विश्वास दाखवत सीएसकेने तब्बल 8.4 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, या लिलावानंतर समीरने सीएसके आणि एमएस धोनी यांच्याविषयी मोठे विधान केले. खरं तर, एमएस धोनी हाच आयपीएल 2024 हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असणार आहे.
जिओ सिनेमावर बोलताना समीर रिझवी (Sameer Rizvi) म्हणाला की, तो खूपच उत्साही आहे, पण एमएस धोनी (MS Dhoni) याच्याशी भेटण्यावर चिंतेतही आहे आणि लिलावादरम्यानही चिंतेत होता. त्याने याविषयीही विधान केले की, त्याला आशा होती की, त्याला खरेदी केले जाईल, पण त्याने असा विचार केला नव्हता की, त्याला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ एवढ्या मोठ्या रकमेत खरेदी करेल.
‘मी घाबरलो होतो’
समीर म्हणाला, “मला आशा होती की, माझी निवड होईल. मात्र, एवढी मोठी बोली लावण्याची आशाच नव्हती.” लिलावावेळी चिंतेत होता का? असे विचारताच तो म्हणाला, “हो, मी पाहिले की, माझ्याआधी 4-5 खेळाडू अनसोल्ड गेले होते, त्यामुळे मी त्यावेळी घाबरलो होतो.”
कोणत्या फ्रँचायझीने त्याला ट्रायलसाठी बोलावले होते? या प्रश्नाचे उत्तर देताना समीर म्हणाला, “मला सर्व दहा संघांकडून फोन आले, पण मी तोपर्यंत U23कडे गेलो होतो. तेव्हाच मला त्यांनी बोलावले. त्यामुळे, सामन्यांमुळे मी जाऊ शकलो नाही. मी फक्त पंजाब, राजस्थआन आणि आरसीबीच्या कँपमध्ये सामील होऊ शकलो.”
‘धोनी माझे आदर्श’
धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याविषयी तो म्हणाला, “ही बिल्कुल वेगळी भावना आहे. कारण, ते नेहमीच माझे आदर्श राहिले आहेत. मी खूपच उत्साही आहे. तरीही त्यांना भेटणार असल्यामुळे थोडा नर्व्हसही आहे. मी त्यांना कधीच डोळ्यासमोर पाहिले नाहीये.”
समीर रिझवीला 4-5 नंबरवर फलंदाजी करणे पसंत आहे. तसेच, तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही याच नंबरवर यशस्वी राहिला आहे. त्याने सांगितले की, “मला 4-5 नंबर खूप आवडतो. 14 वर्षांखालील स्पर्धेत मी सलामीवीर होतो, 16 वर्षांखालील स्पर्धेत माझे प्रशिक्षक ताहिर अब्बास यांनी मला मधल्या फळीत खेळण्यास सांगितले. त्या वर्षी मी खूप धावा केल्या. त्यांनी म्हटले की, मी फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो. त्यामुळे मला मधल्या फळीत फलंदाजी करत राहिले पाहिजे.”
समीरच्या देशांतर्गत कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडू खेळतो. त्याने आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी सामन्यात 17 धावा, तर 11 अ दर्जाच्या सामन्यांत 1 अर्धशतकासह 205 धावा केल्या आहेत. तसेच, 11 टी20 सामन्यात 2 अर्धशतकासह 295 धावांचाही पाऊस पाडला आहे. (sameer rizvi says i was nervous during auction because some players went unsold before me know here)
हेही वाचा-
“जर हा भारतीय खेळाडू लिलावात आला असता, तर 42 कोटी रुपये मिळाले असते”
‘आज खूप काही बदललं…’, भारताला पराभवाचा झटका दिल्यानंतर यजमानांच्या कर्णधाराचं लक्षवेधी भाष्य






