---Advertisement---

गांगुलीपाठोपाठ भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूनेही दिला एमएस धोनीला पाठिंबा

On: बुधवार, जून 26, 2019 4:55 PM
---Advertisement---

22 जूनला 2019 विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध धीम्या गतीने केलेल्या खेळीबद्दल मागील काही दिवसांपासून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण आता धोनीला भारताचा माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी योग्यवेळ आल्यावर धोनी चांगली खेळी करेल असे म्हणत पाठिंबा दिला आहे.

धोनीने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 52 चेंडूत फक्त 28 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने केदार जाधव बरोबर 14 षटके फलंदाजी करताना केवळ 57 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे त्यांच्या या संथ खेळीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही टीका केली होती.

पण आता पाटिल यांनी धोनीला पाठिंबा देताना द क्विंटमध्ये त्यांच्या स्तंभलेखात लिहिले आहे की ‘तो योग्यवेळी चांगली खेळी करेल. माझे शब्द लक्षात ठेवा. भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कुल’ला त्याची लय सापडेल आणि तो चांगला खेळ करेल ज्यामुळे स्पर्धेत पुढे भारतीय संघाला मदत होईल.’

‘भारतीय संघ जेव्हाही दबावात असतो तेव्हा कर्णधार, उपकर्णधार आणि गोलंदाज धोनीकडे सल्ला मागण्यासाठी जातात. बऱ्याचदा भारतासाठी त्याचा सल्ला उपयुक्त ठरतो.’

याबरोबरच 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेले पाटिल यांनी केदार आणि धोनीने केलेल्या संथ खेळीचेही समर्थन केले आहे.

त्यांनी लिहिले आहे की ‘खेळपट्टी फलंदाजीला पोषक नव्हती. भारताने चार विकेट्स लवकर गमावल्या होत्या. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या विकेटचाही समावेश आहे. त्यामुळे जर धोनी आणि केदारने परिपक्वता दाखवली नसती तर कदाचित भारताला 200 धावाही धावफलकावर लावता आल्या नसत्या आणि अफगाणिस्तानने हे लक्ष्य सहज पार केले असते.’

पाटिल यांच्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही धोनीला पाठिंबा दिला होता.

अफगाणिस्तान विरुद्धच्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात केवळ 224 धावा करण्यात यश आले होते. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली होती.

तसेच अफगाणिस्तानने 224 धावांचा पाठलाग करताना भारताला चांगली लढत दिली होती. पण ते विजयापासून केवळ 11 धावा दूर राहिले. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने हॅट्रिक घेतली होती.

भारताचा या विश्वचषकातील पुढील सामना 27 जूनला विंडीज विरुद्ध होणार आहे. हा सामना मॅनचेस्टरला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी बांगलादेशची साथ देणार हा माजी भारतीय खेळाडू

भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशला बसला हा मोठा धक्का

मिशेल स्टार्कच्या या दबरदस्त यॉर्करने स्टोक्स झाला क्लीन बोल्ड! पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment