गेल्या वर्षभरात अनेक भारतीय क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकल्याचे दिसून आले आहे. यात आता वेगवान गोलंदाज संदीप शर्माचाही समावेश झाला आहे. संदीपने त्याच्या प्रेयसी नताशा सात्विकसह काहीदिवसांपूर्वीच लग्न केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
संदीप आणि नताशा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी यावर्षी लग्नगाठ बांधली. त्यांना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संदीप आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. संदीपची पत्नी नताशा ही पेशाने ज्वेलरी डिझायनर आहे.
https://www.instagram.com/p/CS1H_DrBJHM/
दाक्षिणात्य वेशात दिसले नवदाम्पत्य
संदीप आणि नताशा यांचे लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये हे दोघेही दाक्षिणात्य वेशभूषेत दिसत आहेत. संदीपने पांढऱ्या रंगाची कुर्ता आणि धोतर नेसले आहे. तर नताशाने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे. तसेच पारंपारिक पद्धतीचे दागिने घातलेले दिसून येत आहे.
A special addition to the #SRHFamily.😍
Congratulations to Mr and Mrs Sharma 🙌🏽
🥂 to a lifelong partnership!#OrangeOrNothing #OrangeArmy pic.twitter.com/gQcLsX9nIL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 20, 2021
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील कामगिरी
संदीप शर्माने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात खास कामगिरी केली नव्हती. त्याने ३ सामन्यांत १०९ धावा देत केवळ १ विकेट घेतली. त्यामुळे आता युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची हैदराबादला अपेक्षा असेल. येत्या ३१ ऑगस्टला हैदराबाद संघ युएईला रवाना होणार असल्याची शक्यता आहे.
संदीपची कारकिर्द
संदीपने २०१५ साली झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताकडून टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर आत्तापर्यंत त्याला भारताकडून केवळ २ टी२० सामने खेळता आले आहेत. त्याने या २ सामन्यांत १ विकेट घेतली आहे. याशिवाय त्याने ४४ प्रथम श्रेणी सामने खेळताना १६७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४९ अ दर्जाच्या सामन्यांत ८० विकेट्स, तर एकूण १४३ टी२० सामन्यांत १५९ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ९५ सामन्यांत ११० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शानदार बाबर! दमदार अर्धशतकासह पाकिस्तानच्या कर्णधाराचा आणखी एक विक्रम
भारताच्या सर्वात यशस्वी ५ गोलंदांजामध्ये इशांतचा होऊ शकतो समावेश; फक्त ‘ही’ कामगिरी करण्याची गरज
बिग ब्रेकिंग! उर्वरित आयपीएलसाठी आरसीबीच्या ताफ्यात तीन नवे शिलेदार