---Advertisement---

नाद करा पण आमचा कुठं! भारतीय क्रिकेटरचा पत्नीसोबत ‘खतरनाक वर्कआऊट’, पाहून फिरतील डोळे

On: शुक्रवार, मे 28, 2021 5:12 PM
---Advertisement---

भारतीय संघातील खेळाडूंनी गेल्या काही वर्षांपासून फिटनेसवर (तुंदुरुस्ती) अधिक भर दिला आहे. जेव्हापासून विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून तंदुरुस्ती चाचणी पूर्ण केल्याशिवाय खेळाडूंना संघात स्थान दिले जात नाही. परंतु भारतीय संघात असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे तंदुरुस्तीच्या बाबतीत खूप पुढे आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्याइतक्या तंदुरुस्त नाहीत. या गोष्टीला अपवाद ठरवत कोलकाता नाईट रायडर्स संघातील संदीप वॉरियरने आणि त्याच्या पत्नीने आगळावेगळा वर्कआऊट केला आहे. त्यांच्या वर्कआऊटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज संदीप वॉरियर आणि त्याची पत्नी आरती कस्तुरीराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही आगळा वेगळा वर्कआऊट करताना दिसून येत आहेत. संदीप वॉरियर तर तंदुरुस्त आहेच; परंतु त्याच्या पत्नीने केलेला हा वर्कआऊट पाहून हे स्पष्ट झाले आहे की त्याची पत्नीसुद्धा काही कमी फिट नाहीये.

कसा केला हा आगळा वेगळा वर्कआऊट

हा वर्कआऊट सुरू करण्यापूर्वी या जोडीने एकमेकांना बंप केले होते. यानंतर संदीपच्या पत्नीने हातांना आणि पायांना गुंडाळत एक ब्रीज बनवला होता, ज्यावर संदीप वॉरियर इंटरलॉक झाला होता. त्यानंतर दोघांनीही वर्कआऊट केला. संदीप आणि त्याची पत्नी आरतीचा हा आगळा वेगळा वर्कआऊट करत असतानाचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर कॅपशन कॅप्शन त्यांनी ‘कपल गोल्स’ असे लिहिले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेदरम्यान संदीप वॉरियर आणि वरून चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. संदीपने भारतीय अ संघासाठी खेळताना एकूण ५५ सामने खेळले आहेत. यात त्याला ६६ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५७ सामने खेळले आहेत. यात त्याला १८६ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी फक्त रिषभसाठी कसोटी क्रिकेट पाहतो”, इंग्लंडच्या गोलंदाजाने केली मुक्तकंठाने प्रशंसा

राखीव दिवस ते रिव्ह्यू, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम व अटी

‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---