श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिका १-१ अशी बरोबर येत असल्याने हा सामना रोमांचक होण्याची चिन्हे आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याच्या जागी संदीप वॉरियर याला संधी देण्यात आली.
संदीप वॉरियरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. या दरम्यान त्याच्या संपर्कातील इतर आठ खेळाडूंना देखील क्वारंटाईन केले गेले आहे. सध्या भारतीय संघाकडे केवळ ११ खेळाडू उपलब्ध आहेत. या दौऱ्यावर संघासाठी नेट बॉलर म्हणून गेलेल्या अर्शदीप सिंग, सिमरजीत सिंग, संदीप वॉरियर व साईकिशोर यांना प्रमुख संघात सामील केले गेले आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा दुखापतग्रस्त झाला.
त्यामुळे अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने सैनीच्या जागी संदीप वॉरियरला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. वॉरियर भारताचा ९२ वा टी२० क्रिकेटपटू बनला. त्याला आपली पहिली आंतरराष्ट्रीय कॅप संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
Tears of joy! ☺️
The wait is finally over. Welcome to international cricket, Sandeep Warrier. 👏 👏
Go well! 👍 👍 #TeamIndia #SLvIND
Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh pic.twitter.com/KwHAnlO3ZQ
— BCCI (@BCCI) July 29, 2021
कशी राहिली आहे आजवरची कारकीर्द
सध्या ३० वर्षाचा असलेल्या वॉरियरने २०१२ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत तो केरळ संघाचा मुख्य गोलंदाज होता. मात्र, २०२० मध्ये तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या वॉरियरने आतापर्यंत ५७ प्रथमश्रेणी सामन्यात १८६, लिस्ट ए च्या ५५ सामन्यात ६६ तर, ४७ टी२० सामन्यात ४६ बळी मिळवले आहेत. वॉरियर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळत २ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
त्याच नशीबच फुटके! ‘त्या’ घटनेनंतर सैनी जोरदार ट्रोल, चाहत्यांनी शेअर केले मजेदार मीम्स