नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (११ सप्टेंबर) पार पडला. या सामन्यादरम्यान नेपाळ संघाचा फिरकीपटू संदिप लामिच्छाने याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात पापुआ न्यू गिनी संघातील ६ खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
नेपाळ संघाचा अनुभवी फिरकीपटू संदीप लामिच्छाने हा जगभरातील अनेक लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो. या स्पर्धांमध्ये तो लक्षवेधी कामगिरी करून सर्वांचेच मन जिंकत असतो. दरम्यान नेपाळ संघासाठी देखील त्याने चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्याने या सामन्यात ५.१ षटक गोलंदाजी केली आणि पापुआ न्यू गिनीच्या ६ फलंदाजांना माघारी धाडले. त्याच्या गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनी संघातील फलंदाज अडचणीत सापडत होते.
या सामन्यात नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना, ४९.३ षटकात २३३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनी संघाला विजयासाठी २३४ धावांची आवश्यकता होती. परंतु संदीप लामिच्छानेच्या घातक गोलंदाजी समोर पापुआ न्यू गिनीच्या एकही फलंदाजाला विशेष फलंदाजी करता आली नाही. त्याने अवघ्या ११ धावा खर्च करत पापुआ न्यू गिनी संघातील ६ फलंदाजांना माघारी धाडले. या अप्रतिम गोलंदाजीमुळे पापुआ न्यू गिनी संघाचा संपूर्ण डाव १९.१ षटकात अवघ्या ८२ धावांवर संपुष्टात आला. यासह नेपाळ संघाने या सामन्याक १५१ धावांनी विजय मिळवला. तसेच वनडे मालिकेत २-० ची आघाडी देखील घेतली आहे.
संदीपने १८ व्या षटकात अशी काही गोलंदाजी केली की, फलंदाजाला कळतच नव्हते चेंडू टप्पा पडून कुठल्या दिशेला जाईल. त्याने याच षटकाच्या शेवटी असा काही जादुई चेंडू टाकला, जो टप्पा पडताच फलंदाजाची नजर चुकवत मधल्या यष्टीला जाऊन धडकला.(Sandip lamichanne taken 6 wickets in just 5.1 overs)
RECORD: Most wickets in 3 consecutive ODI matches:
16 – Sandeep Lamichhane🇳🇵 in 2020-21
15 – Waqar Younis🇵🇰 in 1990
15 – Shaheen Afridi🇵🇰 in 2019-20 pic.twitter.com/avnYCFL3UE— meme NEPAL (@nepalmeme) September 11, 2021
Sandeep Lamichhane recorded his career-best ODI figures of 6/11 against PNG in the second ODI, helping Nepal to a 2-0 series win 👏#NEPvPNG | 📸 @CricketNep pic.twitter.com/iAUEwW33zN
— ICC (@ICC) September 11, 2021
कोण आहे संदीप लामिच्छाने?
संदीप लामिच्छाने हा नेपाळचा २१ वर्षीय क्रिकेटपटू आहे. हा गोलंदाज आपल्या लेग ब्रेक गुगलीसाठी नेहमी चर्चेत असतो. त्याने १२ वनडे सामन्यात ३३ गडी बाद केले आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २६ सामन्यात ४७ गडी बाद केले आहेत. ३३ लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ७५ बळींची नोंद आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १ ऑगस्ट २०१८ रोजी नेदरलँड संघाविरुद्ध केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही; ‘त्या’ प्रकरणावरुन भारतीय दिग्गजाचा विराट-शास्त्री यांना पाठिंबा