भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने ७ गडी राखून विजय मिळवत टी-२० मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यापैकीच एक म्हणजे उंच काठीचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर, ज्याला तिसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान पदार्पणाची कॅप स्वीकारत असताना संदीप वॉरियर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संदीप वॉरियरला पदार्पणाची कॅप दिली जात आहे आणि त्याला अश्रू अनावर होत आहेत. त्यावेळी संघातील सर्व खेळाडू त्याला मिठी मारून कौतुक करताना दिसून येत आहेत. तर कर्णधार शिखर धवन त्याची पाठ थोपटताना दिसून येत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप वॉरियरला दुखापतग्रस्त असलेल्या नवदीप सैनीऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात चाहत्यांना अपेक्षा होती की, तो चांगली कामगिरी करेल. परंतु चांगली गोलंदाजी करून देखील गडी बाद करण्यात त्याला अपयश आले होते. त्याने आपल्या पहिल्या टी-२० सामन्यात २३ धावा खर्च केल्या. यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही.(Sandip warrier emotional moment after receiving debue cap,watch video)
Tears of joy! ☺️
The wait is finally over. Welcome to international cricket, Sandeep Warrier. 👏 👏
Go well! 👍 👍 #TeamIndia #SLvIND
Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh pic.twitter.com/KwHAnlO3ZQ
— BCCI (@BCCI) July 29, 2021
संदीप वॉरियरची कारकीर्द
संदीप वॉरियर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करत असताना एकूण ५७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याला १८६ गडी बाद करण्यात यश आले आहे.
तसेच तिसऱ्या टी-२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला. कुलदीप यादवच्या २३ धावा सोडल्या तर एकही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. २० षटक अखेर भारतीय संघाला ८ बाद ८१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाने हे आव्हान ७ गडी आणि ३० चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कमालच! श्रीलंका दौऱ्यात वनडे अन् टी२० पदार्पण केलेल्या खेळाडूंचा तयार होऊ शकतो आख्खा एक भारतीय संघ
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची झाली सांगता; पाहा कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा अन् विकेट्स
‘शिखर सेने’च्या नावे भारताचा टी२० इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव