पुणे – युग अगरवालच्या हॅटट्रिकने क्रीडा प्रबोधिनी संघाने पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये आज ग्रीन बॉक्स, एफए संघाचा ९ गोलने धुव्वा उडवला. आजच झालेल्या अन्य एका सामन्यात संगम यंग बॉईज संघाने एफसी बेकडिन्हो बी संघावर सहज विजय मिळवून तृतिय श्रेणीतून आपली आगेकूच कायम राखली.
एसएसपीएमसच्या मैदानावर झालेल्या युवा विभागातील सामन्यात क्रीडा प्रबोधिनीची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिसऱ्याच मिनिटाला त्यांच्या नव जैन याने संघाचे खाते उघडले. त्यानंतर युगने हॅटट्रिक केली. पुढे आदित्य जाधव, आयन शेख, ओम हिरवळे, साई पटेल, अर्जुन डांगे यांनी प्रत्येकी एकेक गोल करत संघाचा मोठा विजय साकार केला.
याच मैदानावरील अन्य एका सामन्या पहिल्या आठ मिनिटांतच तीन गोल करून रायझिंग पुणे एफसी संघाने स्टेप ओव्हर एफएविरुद्धच्या सामन्यातील आपला विजय जवळ जवळ निश्चित केली. पहिल्याच मिनिटाला हर्षित शहाने खाते उघडले. त्यानंतर विवान डे याने ५ आणि ८व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. सामन्याच्या नवव्या मिनिटाला स्टेप ओव्हरच्या रोहन उत्तेकर याने गोल करून विश्रांतीला पिछाडी एक गोलने भरून काढली. पण, त्यांनी तेवढ्यावरच समाधान मानावे लागले. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला वंश पाटिलने चौथा गोल केला.
तृतिय श्रेणीच्या सप मैदानावर झालेल्या सामन्यात संगम यंग बॉईज संघाने एफसी बेकोडिन्हो ब संघावर ४-० असा विजय मिळविला. स्टॅलियन अरलॅंडने १७, तर शॅनन अरलॅंडने २४, ३२व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. सामन्याच्या उत्तरार्धात ५२व्या मिनिटाला यश मोरेने त्यांचा चौथा गोल केला.
निकाल –
सप महाविद्यालय –
गट ई – नाझ एफसी २ (प्रतिक पोरे २९, ३०+1 मिनिट), वि.वि. जुन्नर तालुका १ (१५वे मिनिट)
गट एफ – गोल्डन फेदर ३ (आदित्य चव्हाण ८वे, आदित्य मोरे २१वे मिनिट, सिद्धार्थ सोनावणे २३वे मिनिट) वि.वि. कन्सिएंट फुटबॉल ०
गट एफ – पुणेरी वॉरियर्स ३ (विकास गुप्ता १०, ३४वे मिनिट, संकेत डोंगरे २५वे मिनिट) वि.वि. परशुरामियन्स एससी सी १ (समर्थ जाधव १८वे मिनिट)
गट जी – दुर्गा स्पोर्टस अॅकॅडमी १ (अभिषेक पाल ८वे मिनिट) बरोबरी वि. ईगल एफसी १ (जतिंद्र चौहान १५वे मिनिट)
गट जी – सिटी एफसी पुणे ३ (स्वप्नील महामुनी ८वे, अमित जरे ४२, ५२वे मिनिट) वि.वि. कमांडोज बी ०
गट अ – संगम यंग बॉईज ब ४ (स्टॅलियन अरलॅंड १७वे मिनिट, शॅनन अरलॅंड २४, ३२वे मिनिट. यश मोरे ५२वे मिनिट) वि.वि. एफसी बेकडिन्हो बी ०
एसएसपीएमएस मैदान –
गट सी – मॅथ्यू एफए ४ (अंकित गावरे ३रे, अर्जुन तावरे २३वे, सागर जगताप ४१वे, नीरव साळवी ६०वे मिनिट) वि.वि. पुणे वॉरियर्स ०
रायन एफए ० बरोबरी वि. ४ लायन्स ०
ब्लॅक हॉक्स ५ (तन्मय कर्डिले ५१वे, अथर्व कुडाळे १८, २९वे, प्रणील इंगळे ६०+२रे मिनिट) वि.वि. यंग स्टेप्स एफसी २ (संतोष नांदवे १२, २२वे मिनिट))
गट बी – क्रीडा प्रबोधिनी ९ (नव जैन ३रे, युग अगरवाल १४, २१, २५वे, आदित्य जाधव ३५वे, आयन शेख ४१वे, ओम हिरवळे ५१वे, साई पाटिल ५५वे, अर्जुन डांगे ५७वे मिनिट) वि.वि. ग्रीन बॉ़क्स एफएस ०
गट अ -रायझिंग पुणे एफसी ४ (हर्षित शाह १ले, विवान डे ५, ८वे, वंश पाटिल ३९वे मिनिट) वि.वि. स्टेप ओव्हर एफए (रोहन उत्तेकर ९वे मिनिट)
बेटा स्पोर्टस क्लब (पुढे चाल) वि. भोर एफसी ०
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा फॉर्मात परतत विराटला टीम इंडियाला जिंकून द्यायचाय विश्वचषक, ब्रेकबद्दलही दिलीय प्रतिक्रिया
गुजरातविरुद्ध आरसीबीच्या स्टार गोलंदाजाने का टाकले फक्त एकच षटक; धक्कादायक कारण आले समोर
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’