पुणे (18 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज सांगली विरुद्ध नाशिक ही महत्वपूर्ण लढत झाली. दोन्ही संघाना विजय महत्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघानी आक्रमक सुरुवात करत गुण मिळवले त्यानंतर मात्र संथ खेळ करत कोणत्याही संघाने आपल्या विरुद्ध संघाला मोठी आघाडी मिळू दिली नाही. 11 मिनिटाच्या खेळानंतर सामना 10-10 असा बरोबरीत होता.
दोन्ही संघ एकमेकांना चांगली लढत देत होते. नाशिक कडून पवन भोर ने चतुरस्त्र चढाया करत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. मध्यांतराला नाशिक संघाने 22-19 अशी आघाडी संपादन केली होती. मध्यंतरा नंतर काही मिनिटाच्या खेळानंतर सांगली संघाने जोरदार पलटवार करत 26-25 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ही सामना अत्यंत चुरशीचा झाला. सांगली संघाकडे आघाडी कायम होती. शेवटची चार मिनिटं शिल्लक असताना 37-37 असा सामना पुन्हा एकदा बरोबरीत आला.
उत्तरार्धात सांगलीच्या अभिषेक गुंगे ने चढाईत महत्वपूर्ण गुण मिळवत तर पकडीत बचवाफळीने उत्कृष्ट पकडी करत सामना आपल्या बाजूने केला. सांगली संघाने 43-40 असा सामना जिंकत प्रमोशन फेरीत प्रवेश निश्चित केला. सांगली कडून अभिराज पवार व अभिषेक गुंगे ने महत्वपूर्ण खेळी केली. अभिराज पवार ने 13 गुण मिळवले. तर अभिषेक गुंगे ने 11 गुणांची अष्टपैलू खेळी केली. तर नाशिकच्या पवन भोर ने 15 गुण मिळवत सुपर टेन पूर्ण केला तसेच जयेश पाटील ने अष्टपैलू खेळ करत हाय फाय पूर्ण केला. (Sangli team entered the promotion round by defeating Nashik team)
बेस्ट रेडर- पवन भोर, नाशिक
बेस्ट डिफेंडर- जयेश पाटील, नाशिक
कबड्डी का कमाल- अभिराज पवार, सांगली
महत्वाच्या बातम्या –
“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!
जबरदस्त! राशिद खानचा ‘नो लूक’ षटकार, चेंडू सरळ मैदानाबाहेर!