---Advertisement---

पत्नीचं प्रेम! ओव्हल कसोटीतील शानदार कामगिरीनंतर बुमहारची पत्नी संजनाची स्पेशल पोस्ट, फोटो व्हायरल

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 4:07 PM
---Advertisement---

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला १५७ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. यासह मालिकेत २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लक्षवेधी कामगिरी केली होती.या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यावर जोरदार पकड बनवली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान पत्नी संजना गणेशनने देखील पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघातील फलंदाजांनी चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर ) चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच मोईन अलीने म्हटले होते की,”बुमराह यजमान संघासाठी घातक ठरू शकतो.” मोईन अलीचे हे बोलणे खरे करून दाखवत बुमराहने अवघ्या २७ धावा करत २ महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पराक्रम देखील केला.

जसप्रीत बुमराहने केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान त्याची पत्नी संजना गणेशनने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जसप्रीत बुमराहचा फोटो शेअर करत त्याचे गुणगान गायले आहे. तिने फलंदाजाला बाद केल्यानंतर बुमराह जल्लोष साजरा करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून तिने ” आज आणि दररोज तुझा अभिमान आहे”, असे लिहिले आहे.

Photo Courtesy: Instagram/@sanjanaganesan

ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीपासूनच योग्य लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी केली होती. अखेरच्या दिवशी लंच ब्रेक पर्यंत इंग्लंड संघ मजबूत स्थितीत होता.

त्यावेळी कर्णधार कोहलीने आपला सर्वात विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. त्याने गोलंदाजीला येताच ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो या दोघांना त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. ज्यामुळे भारतीय संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले होते. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत १८ गडी बाद केले आहेत. सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“जितक्या उचक्या अश्विनला या मालिकेत लागल्या असतील तितक्या संपूर्ण आयुष्यात देखील लागल्या नसतील”

लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO

पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---