---Advertisement---

बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

On: सोमवार, जून 21, 2021 3:16 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर खेळला जात आहे. या ऐतिहासिक सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय फलंदाजांना धावांचा डोंगर उभारण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात अवघ्या २१७ धावा करता आल्या. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज देखील गडी बाद करण्यात अपयशी ठरत आहेत.

भारतीय संघाचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराहला अद्याप एकही गडी बाद करण्यात यश आले नाहीये. या दरम्यान त्याची पत्नी संजना गणेशनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत.

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २१७ धावांवर संपुष्टात आला होता. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते. परंतु जेव्हा भारतीय गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आले होते, तेव्हा खेळपट्टीकडून त्यांना पुरेशी मदत मिळताना दिसत नव्हती. यावेळी संघातील मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे दिसले. तिसऱ्या दिवशी बुमराहने ११ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ३४ धावा खर्च केल्या. परंतु त्याला एकही गडी बाद करता आली नाही.(Sanjana ganeshan targeted after bumrah sturgggled)

संजना गणेशनवर साधला जात आहे निशाना
तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर संजना गणेशनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती दिनेश कार्तिकसोबत समालोचन करताना दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन म्हणून तिने, “कामावरचा दिवस खूप मजेशीर होता,” असे लिहिले आहे.

या फोटोवर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रतिक्रीया देत लिहिले की, “परंतु तुझ्या पतीचा दिवस चांगला नव्हता.” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तू मजा केलीस. परंतु तुझ्या पतीने केली नाही. सर्व आयसीसीच्या स्पर्धांमध्ये फ्लॉप.” एका युजरने तर, “बुमराहला वेगळे राहू द्या,” असे देखील म्हटले आहे.

हे पहिल्यांदा घडत नाहीये, जेव्हा क्रिकेटपटूच्या पत्नीवर निशाणा साधला जात आहे. २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉर्ड्स कसोटी सामन्यात विराट कोहली ० धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर अनेकांनी अनुष्का शर्मावर निशाणा साधला होता. एका युजरने ट्विट करत लिहिले होते की, “गोल्डन डक विराट कोहली अनुष्का शर्माला गिफ्ट करेल.” मुख्य बाब म्हणजे, विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा तेव्हा विवाह देखील झाला नव्हता आणि ती भारतातच होती.

महत्वाच्या बातम्या 

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी, ‘या’ चुकांमुळे कसोटी चॅम्पियनशीप जेतेपद धोक्यात!

‘सलामी जोडीनंतर न्यूझीलंडची अजून एक मोठी विकेट मिळाली असती, पण…,’ गिलचे वक्तव्य

पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---