भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनच्या षटकार मारण्याच्या क्षमतेची तुलना युवराज सिंगशी केली आहे. सॅमसनला गेल्या काही मालिकेपासून टी20 संघात डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्याने अनेक उत्कृष्ट खेळी खेळून या संधीचा फायदा घेतला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, सॅमसन अनेकदा संघाबाहेर असायचा पण टी20 विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर, संजूने सलामीवीर म्हणून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे. त्याने अलीकडील टी20 मालिकेत तीन शतकांसह 436 धावा केल्या आहेत.
संजय बांगर यांनी सॅमसनच्या मोठ्या कामगिरीबद्दल कौतुक केले आणि अखेर त्याला धावा काढताना पाहून आनंद झाला असे म्हटले. संजूला दीर्घ संधी देणाऱ्या आणि मोकळेपणाने खेळण्याची संधी देणाऱ्या संघ व्यवस्थापनाचेही त्यांनी कौतुक केले.
संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “संजूला अलिकडे मिळालेले यश पाहून आनंद झाला. तो बराच काळ येथे आहे. त्याला योग्य संधी मिळाली आहे आणि त्याला सलग अनेक संधी मिळाल्या आहेत कारण प्रत्येक फलंदाज, जर तो सलग तीन किंवा चार सामने खेळत असेल तर त्याला त्यातून थोडीशी स्वातंत्र्य मिळते.”
“वरील क्रमवारीत फलंदाजी करताना, त्याला फिल्डबद्दल काळजी करण्याची गरज नाही. पावरप्लेमध्ये तो क्रीझवर थांबून सहज षटकार मारु शकतो. युवराज सिंगनंतर, जर असा कोणी फलंदाज असेल जो सातत्याने हे सहज करू शकतो तर तो संजू सॅमसन आहे. त्यामुळे त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळताना पाहणे हा खरोखरच एक उत्तम अनुभव आहे.”
हेही वाचा-
IND vs ENG: या आयपीएल कर्णधाराला टीम इंडियात स्थान नाही, खराब फॉर्म ठरलं कारण?
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे उपकर्णधारपद, हार्दिककडे पुन्हा दुर्लक्ष
14 महिन्यांनतर मोहम्मद शमीचे पुनरागमन! नाही खेळणार सर्व सामने? मोठे अपडेट समोर