अलिकडेच घोषित झालेल्या श्रीलंकेदाैऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी20 संघासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. वास्तविक, टी20 विश्वचषकाच्या यशानंतर कर्णधार रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. दरम्यान विश्वचषक 2024 मध्ये उपकर्णधारपदाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याला रोहित शर्मा नंतर पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात होते. आश्या परिस्थितीत टीम इंडियाच्या हेड कोच पदी गाैतम गंभीरची नियुक्ती झाल्याने, भारतीय टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले. असा अंंदाज मीडिया रिपोर्ट्समधून केला जात आहे. पण अद्याप या बाबत बीसीसीआयकडून कोणतेही विधान समोर आले नाही.
वास्तविक, भारतीय टी20 संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवला निवडल्याने क्रिकेटमधील काही जाणकार म्हणत आहेत. हा चांगला निर्णय आहे. तर काहीजण हार्दिकला कर्णधारपद द्यायला पहिजे होत असे ही म्हणत आहेत. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगरने देखील याबाबत प्रतिक्रिया दिले आहे.
एका टी. व्ही. चॅनेलशी बोलताना, संजय बांगर म्हणाले की, “असं नाही की सूर्या आंतरराष्ट्रीय सामने कमी खेळल्याने त्याला कर्णधारपद न द्यावे, शिवाय त्याला माहीत आहे की कोणत्या खेळाडू कडून त्याच्यामधील चांगले कसे घेता येईल, कारण सूर्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. आणि मला विश्वास आहे की सूर्या भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करुन दाखवेल. परंतु मला असे वाटते हार्दिक पांड्या सोबत ही अन्याय झाले आहे”.
पुढे बोलताना बांगर म्हणाले ,”हार्दिक पांड्याला कर्णधारपद न दिल्याने मी पण आश्चर्यचकित आहे. कारण मागील टी20 विश्वचषक नंतरच हार्दिकला पांड्याला टी20 मध्ये कर्णधार होणार असल्याची चर्चा होती. पण त्यावेळी हार्दिक दुखापती झाला नसता तर कर्णधारपद मिळाले असते.”
वास्तविक सांगायचे झाले तर टी20 विश्वचषक 2022 नंतर रोहित शर्माने खूप दिवसांपासून टी20 क्रिकेट खेळले नव्हते. त्यावेळी भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्यानेच सांभाळली होती आणि त्याने टीम इंडियासाठी त्याने शानदार कामगिरी देखील केले होते. परंतु एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दरम्यान दुखापत झाल्याने हार्दिक पांड्याला बऱ्याच दिवसांसाठी संघातून बाहेर रहावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला बसणार 440 वोल्टचा झटका, चॅम्पियन्स ट्राॅफीचं यजमानपद धोक्यात?
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणार चाचणी
व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!