भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (India Tour Of South Africa) तयारीत व्यस्त आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला, २६ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने ४ राखीव खेळाडूंसह १८ सदस्यीय मुख्य संघाची घोषणा केली आहे. या संघात हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या फॉर्ममध्ये असलेल्या प्रतिभाशाली फलंदाजांनाही जागा देण्यात आली आहे.
विहारीकडे श्रेयसपेक्षा कसोटीचा चांगला अनुभव आहे. तर श्रेयसनेही नुकतेच कसोटीत पदार्पण करत चांगली कामगिरी केली आहे. हे दोन्ही फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मधळ्या फळीत संघासाठी दमदार कामगिरी करू शकतात. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) या दोघांपैकी कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळायला पाहिजे?, याबद्दल आपले मत मांडले आहे.
बांगर यांच्या मते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विहारीला आधी संधी दिली गेली पाहिजे. कारण त्याने बऱ्याचदा कठीण परिस्थितीत संघासाठी चांगल्या खेळी खेळल्या आहेत.
‘स्टार स्पोर्ट्स’च्या ‘गेम प्लॅन शो’मध्ये बोलताना बांगर यांनी सांगितले की, श्रेयस, विहारी यांच्यापैकी कोणाला मधळ्या फळीतील पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली पाहिजे. ते म्हणाले की, “जर मला श्रेयस आणि विहारी यांच्यापैकी एकाला निवडायला सांगितले तर, मी विहारीला प्राधान्य देईल. कारण त्याने भारतीय संघाची त्याप्रकारे सेवा केली आहे. परदेशी दौऱ्यावर तर तो श्रेयसच्या पुढे खेळण्याचा हक्कदार आहे. माझ्या मते, सध्या श्रेयसचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. त्यामुळे तोही पाचव्या क्रमांकावर आपला दावा सांगतोय.”
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेतून कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या श्रेयसची कामगिरी अतिशय प्रशंसनीय राहिली आहे. त्याने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजांचा घाम काढला होता आणि शतक ठोक आपले नाणे खणखणीत वाजवले होते. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दुर्लक्षित राहिलेल्या विहारीला इंडिया ए संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवले गेले होते. तिथे या फलंदाजाने आपल्या धावांचा रतीब घातला होता.
अशात भारताचे संघ व्यवस्थापन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत विहारी आणि श्रेयसपैकी कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवेल?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
थेट रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाल आहे तरी कोण? प्रथम श्रेणीत ठोकलीत २४ शतके
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “तो माझ्या कार्यकाळातील सर्वात वाईट दिवस”
बिग ब्रेकिंग: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ‘आऊट’; युवा सलामीवीराची लागली लॉटरी