भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर यानं लिंग बदललं आहे. आर्यननं काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं की त्यानं हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) आणि जेंडर ॲफर्मिंग सर्जरी केली असून तो आता ‘अनया बांगर’ बनला आहे.
या थेरपीनं हळूहळू त्याच्या शरीरात अनेक बदल घडवून आणले. यामुळे त्याचे स्नायू आणि ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यानं हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन थेरपी दरम्यान होणारे बदल आणि संघर्ष देखील स्पष्ट केले. ही बाब लोकांच्या लक्षात आल्यापासून संजय बांगर यांचा मुलगा चर्चेत आहे. आर्यननं लिंग बदलाचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे. आता खुद्द अनया बांगरनं याचा खुलासा केला.
अनया बांगरनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिनं तिच्या चाहत्यांना त्यांचे प्रश्न विचारण्यास सांगितलं. अशाप्रकारे लोकांना तिला थेट प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य मिळालं. याला अनया बांगरनं खूप चांगलं उत्तर दिलं. एका चाहत्यानं प्रश्न विचारला की, तू मुलगी का झालास? यावर अनायानं उत्तर दिलं की, “लहानपणापासून मला वाटत होतं की मी मुलगी असावी.”
अनया बांगर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचा परिवर्तनाचा प्रवासही शेअर करत असते. काही काळापूर्वी तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली होती. या रीलमध्ये तिनं सांगितलं की, गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन थेरपीमुळे तिच्या शरीरात अनेक बदल होत आहेत. तिनं सांगितलं की तिची ताकद कमी होत आहे, परंतु तिचा आनंद वाढला आहे.
हेही वाचा –
IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरची अप्रतिम कामगिरी, या स्पर्धेत झळकावले शानदार शतक
IPL 2025; मेगा लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? पंजाब किंग्जकडे सर्वाधिक तर….
कसोटी क्रिकेटमध्ये फाईव्ह विकेट हॉल घेणारे भारतीय कर्णधार, दिग्गजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश!