माजी भारतीय क्रिकेटपटू व सध्या समालोचक म्हणून काम करणारे संजय मांजरेकर भारतीय क्रिकेटपटूंवर केलेल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. यामुळे, संजय मांजरेकर यांना चाहत्यांच्या रोषाचा बळी पडावे लागते. मांजरेकर यांनी यापूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजावर टिप्पणी केली होती. त्यानंतर, त्यांना चाहत्यांनी फैलावर घेतलं होते. दरम्यान, त्यांनी आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर टीका केली आहे.
रिषभ पंतने केली यष्टीरक्षणात चूक
‘भारताच्या कसोटी संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. मात्र, अनेकदा त्याच्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह लावले जाते. चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी देखील त्याने इंग्लंडचा फलंदाज जॅक लिच याला यष्टीचीत करण्याची सोपी संधी दवडली. त्यानंतर गोलंदाज रवीचंद्रन अश्विन कमालीचा नाराज दिसला व त्याने डोके धरले. हे पाहून संजय मांजरेकर यांनी एक ट्विट केले.
मांजरेकर यांनी केले ट्विट
रिषभ पंतच्या खराब यष्टीरक्षणानंतर संजय मांजरेकर यांनी ट्विट करत लिहिले, “यष्टीरक्षणाची संधी कोणीही गमावू शकतो. अगदी दिग्गजांकडून ही अशा चुका झाल्या आहेत. मात्र, अश्विनच्या चेंडूवर पंतने जी संधी सोडली, त्यावरून स्पष्ट होत आहे की, तो कसा यष्टीरक्षक आहे.”
Everyone misses stumping. Even great keepers do but the way Pant missed that stumping of Leach off Ashwin tells me all I need to know about Pant the keeper.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 7, 2021
मांजरेकर झाले ट्रोल
रिषभ पंतवर टीका केल्यानंतर संजय मांजरेकर चाहत्यांच्या निशाण्यावर आले. एका चाहत्याने म्हटले, पंतने १० वेळा यष्टीचीत करण्याच्या संधी सोडल्या तरी साहा त्याची जागा घेऊ शकत नाही. चेन्नई येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स याचा सोपा झेल देखील सोडला होता.
महत्वाच्या बातम्या:
अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे मोहम्मद अझरुद्दीनचं आयुष्य, वाचा सविस्तर
अनुष्काने बर्प क्लोथसोबत फोटो अपलोड करताच हार्दिक पंड्याची मजेशीर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला
व्हिडिओ : सामना चालू असतांना भर मैदानात आली मांजर, मग नंतर घडले असे काही





